सामान्यनाम

नामाचे प्रकार

एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.

'सामान्यनाम' म्हणजे काय?

'सामान्यनाम' म्हणजे काय?

एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.

ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.

सामान्यनामाची वैशिष्ट्ये

सामान्यनामाची काही वैशिष्ट्ये

  • सामान्यनाम हे नेहमी 'जातीवाचक' असते. सामान्यनामामुळे एखादी वस्तू किंवा प्राणी ज्या नावाने ओळखला जातो, त्या प्रकाराचा अथवा जातीचा अर्थबोध होतो.
  • सामान्यनाम हे जातीवाचक असल्यामुळे त्याचे बहुदा 'अनेकवचन' होते.
उदाहरणे

सामान्यनामाची काही उदाहरणे -

मुलगा मुलगी घर शाळा
नदी दूध पाणी पर्वत
गाय मांजर शिक्षक शेतकरी
नाम म्हणजे काय? विशेषनाम

This educational article was first posted on and last updated on by