समास आणि विग्रह


समासाचे प्रकार


समास म्हणजे काय?

मराठी व्याकरणात शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.

नियम क्र. १

“ सम् + आस ” या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला आहे.

नियम क्र. २

समास या शब्दाचा अर्थ “एकत्र करणे” असा आहे.

समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात.

नियम क्र. ३

ज्याप्रमाणे व्यवहारात आपण काटकसरीने वागतो, त्याप्रमाणे भाषा हे सुद्धा व्यवहाराचे एक अंग आहे.

भाषेमधून आपण आपले विचार, भावना, मत व्यक्त करत असतो.

तिथेही जर काटकसर करून योग्य ते शब्द वापरले, तर त्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते.

समास म्हणजे अशी भाषेतील काटकसर होय.

सामासिक शब्द आणि विग्रह

  • दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात.
  • तसेच, हा सामासिक शब्द ज्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी शब्दांची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात.
  • विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय.

उदाहरणार्थ,

सामासिक शब्द विग्रह
दरसाल प्रत्येक वर्षी
राजकन्या राजाची कन्या
राजपुत्र राजाचा पुत्र
महापुरूष महान पुरूष
दररोज प्रत्येक दिवशी

समासाचे प्रकार

समासात कमीत कमी शब्द किंवा पदे एकत्र येतात. त्यांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व आहे यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत.

१. अव्ययीभाव समास

अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद मुख्य असते, तर दुसरे पद गौण असते.

उदाहरणार्थ – दररोज, आमरण, बिनधास्त, यथाशक्ती, बिनतक्रार इत्यादी

  अव्ययीभाव समासाविषयी अधिक माहिती वाचा

२. तत्पुरूष समास

तत्पुरूष समासामध्ये दुसरे पद मुख्य असते, तर पहिले पद गौण असते.

उदाहरणार्थ – महाशक्ती, राजपुत्र, सेवानिवृत्त, स्वर्गादपि, कृतज्ञ, नापसंत इत्यादी

  तत्पुरूष समासाविषयी अधिक माहिती वाचा

 विभक्ती तत्पुरूष समास

 अलुक् तत्पुरूष समास

 उपपद तत्पुरूष समास

 नञ तत्पुरूष समास

 कर्मधारय तत्पुरूष समास

 द्विगू तत्पुरूष समास

 मध्यमपदलोपी तत्पुरूष समास

३. द्वंद्व समास

द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे मुख्य असून कोणतेही पद गौण नसते.

उदाहरणार्थ – मिसळपाव, सत्यासत्य, भाजीपाला, चहापाणी, मायबाप, खरेखोटे इत्यादी

  द्वंद्व समासाविषयी अधिक माहिती वाचा

 इतरेतर द्वंद्व समास

 वैकल्पिक द्वंद्व समास

 समाहार द्वंद्व समास

४. बहुव्रीही समास

बहुव्रीही समासामध्ये शब्दाच्या अर्थावरून एखाद्या तिसऱ्याच पदाचा बोध होतो.

उदाहरणार्थ – लंबोदर, चंद्रशेखर, सिंहारूढ, निर्धन, भालचंद्र, अनियमित, सुमंगल, प्रज्ञावंत इत्यादी

  बहुव्रीही समासाविषयी अधिक माहिती वाचा

 विभक्ती बहुव्रीही समास

 नञ बहुव्रीही समास

 सहबहुव्रीही समास

 प्रादिबहुव्रीही समास

This article has been first posted on and last updated on by