समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
अव्ययीभाव समास
जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
दररोज = प्रत्येक दिवशी
दररोज हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक दिवशी हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून दररोज हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
आमरण = मरणापर्यंत
आमरण हा एक सामासिक शब्द आहे, तर मरणापर्यंत हा त्याचा विग्रह आहे.
या शब्दामध्ये आ हा संस्कृतमधील उपसर्ग आहे. संस्कृतमध्ये उपसर्ग हे अव्यय म्हणून वापरले जाते.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
बिनशर्त = कोणत्याही अटीशिवाय
बिनशर्त हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही अटीशिवाय हा त्याचा विग्रह आहे.
या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
बिनतक्रार = कोणत्याही तक्रारीशिवाय
बिनतक्रार हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही तक्रारीशिवाय हा त्याचा विग्रह आहे.
या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
बिनधास्त = कोणत्याही धास्तीशिवाय
बिनधास्त हा एक सामासिक शब्द आहे, तर कोणत्याही धास्तीशिवाय हा त्याचा विग्रह आहे.
या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग असून त्यातील पहिले पद महत्वाचे आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ६
यथाशक्ती = शक्तीप्रमाणे
यथाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे, तर शक्तीप्रमाणे हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून यथाशक्ती हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ७
यथाकाल = काळाप्रमाणे
यथाकाल हा एक सामासिक शब्द आहे, तर काळाप्रमाणे हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून यथाकाल हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ८
प्रतिक्षण = प्रत्येक क्षणाला
प्रतिक्षण हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक क्षणाला हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून प्रतिक्षण हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ९
प्रतिदिन = प्रत्येक दिवशी
प्रतिदिन हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक दिवशी हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून प्रतिदिन हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. १०
पावलोपावली = प्रत्येक पावलात
पावलोपावली हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक पावलात हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून पावलोपावली हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ११
घरोघरी = प्रत्येक घरी
घरोघरी हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक घरी हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून घरोघरी हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. १२
क्षणोक्षणी = प्रत्येक क्षणाला
क्षणोक्षणी हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रत्येक क्षणाला हा त्याचा विग्रह आहे.
यामधील पहिले पद महत्वाचे असून क्षणोक्षणी हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.