समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

तत्पुरूष समास

जेव्हा समासातील दुसरे पद किंवा दुसरा शब्द महत्वाचा असतो आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्तीचा प्रत्यय दोन पदांमध्ये घालावा लागतो, तेव्हा त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

महाशक्ती = महान अशी शक्ती

महाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे, तर महान अशी शक्ती हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये गाळलेल्या शब्दांचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

राजपुत्र = राजाचा पुत्र

राजपुत्र हा एक सामासिक शब्द आहे, तर राजाचा पुत्र हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “चा” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

मातृऋण = मातेचे ऋण

मातृऋण हा एक सामासिक शब्द आहे, तर मातेचे ऋण हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “चे” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

कालौघात = काळाच्या ओघात

कालौघात हा एक सामासिक शब्द आहे, तर काळाच्या ओघात हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “च्या” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

कृष्णावतार = कृष्णाचा अवतार

कृष्णावतार हा एक सामासिक शब्द आहे, तर कृष्णाचा अवतार हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “चा” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ६

तोंडपाठ = तोंडाने पाठ

तोंडपाठ हा एक सामासिक शब्द आहे, तर तोंडाने पाठ हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “ने” हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ७

वामनावतार = वामनाचा अवतार

वामनावतार हा एक सामासिक शब्द आहे, तर वामनाचा अवतार हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये “चा” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ८

कंबरपट्टा = कंबरेवरील पट्टा

कंबरपट्टा हा एक सामासिक शब्द आहे, तर कंबरेवरील पट्टा हा त्याचा विग्रह आहे.

यामधील दुसरे पद महत्वाचे असून त्याचा विग्रह करताना दोन पदांमध्ये गाळलेल्या शब्दांचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे त्याला तत्पुरूष समास असे म्हणतात.

तत्पुरूष समासाचे उपप्रकार

मराठी व्याकरणातील तत्पुरूष समासाचे सात उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. विभक्ती तत्पुरूष समास

या समासामध्ये विग्रह करताना एखाद्या विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ – देवाश्रित, सुखहीन, कमरपट्टा, भयमुक्त, वनदेवी, घरगडी इत्यादी

अधिक माहिती

२. अलुक् तत्पुरूष समास

या समासामध्ये पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही.

उदाहरणार्थ – पंकेरूह, तोंडीलावणे, स्वर्गादपि, कर्तरीप्रयोग इत्यादी

अधिक माहिती

३. उपपद तत्पुरूष समास

या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असून ते एखादे धातुसाधित असते.

उदाहरणार्थ – शेतकरी, कृतज्ञ, कथाकार, मार्गस्थ, ग्रंथकार इत्यादी

अधिक माहिती

४. नञ तत्पुरूष समास

या समासामध्ये पहिले पद नेहमी नकारार्थी असते.

उदाहरणार्थ – अहिंसा, नापसंत, बेशिस्त, गैरहजर, असहमत इत्यादी

अधिक माहिती

५. कर्मधारय तत्पुरूष समास

या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.

उदाहरणार्थ – महादेव, रामदयाळ, पांढराशुभ्र, कमलनयन, कन्यारत्न इत्यादी

अधिक माहिती

६. द्विगू तत्पुरूष समास

या समासामधील पहिले पद हे नेहमी एखादे संख्याविशेषण असते.

उदाहरणार्थ – त्रिखंड, बारमास, अष्टचक्र, सप्तर्षी, नवरात्र इत्यादी

अधिक माहिती

७. मध्यमपदलोपी तत्पुरूष समास

या समासामधील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप (लुप्त) करावी लागतात.

उदाहरणार्थ – नारळीभात, तीळपोळी, मसालेभात, मावसबहिण, बालमित्र इत्यादी

अधिक माहिती

This article has been first posted on and last updated on by