वैकल्पिक द्वंद्व समास

द्वंद्व समासाचे प्रकार

ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' यांपैकी एखाद्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

वैकल्पिक द्वंद्व समास

'वैकल्पिक द्वंद्व समास' म्हणजे काय?

ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' यांपैकी एखाद्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

वैकल्पिक द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये
  • वैकल्पिक द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
  • या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
  • या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ यांपैकी एखाद्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, असे लक्षात येते.
वैकल्पिक द्वंद्व समासाची काही उदाहरणे

वैकल्पिक द्वंद्व समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • चारपाच = चार किंवा पाच

'चारपाच' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'चार किंवा पाच' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'चार' आणि 'पाच' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'किंवा' या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • पासनापास = पास अथवा नापास

'पासनापास' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पास अथवा नापास' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'पास' आणि 'नापास' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'अथवा' या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • मागेपुढे = मागे वा पुढे

'मागेपुढे' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'मागे वा पुढे' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'मागे' आणि 'पुढे' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'वा' या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • सत्यासत्य = सत्य किंवा असत्य

'सत्यासत्य' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सत्य किंवा असत्य' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'सत्य' आणि 'असत्य' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'किंवा' या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.

वैकल्पिक द्वंद्व समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
धर्माधर्मधर्म अथवा अधर्म
खरेखोटेखरे किंवा खोटे
भलेबुरेभले वा बुरे
पाचपन्नासपाच वा पन्नास
दोनचारदोन किंवा चार
न्यायान्यायन्याय अथवा अन्याय
इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास

This educational article was first posted on and last updated on by