द्वंद्व समास

समासाचे प्रकार

ज्या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान (महत्त्वाची) म्हणजेच समान दर्जाची असतात, त्या समासाला 'द्वंद्व समास' असे म्हणतात.

'द्वंद्व समास' म्हणजे काय?

'द्वंद्व समास' म्हणजे काय?

ज्या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान (महत्त्वाची) म्हणजेच समान दर्जाची असतात, त्या समासाला 'द्वंद्व समास' असे म्हणतात.

काही वैशिष्ट्ये

द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये

  • द्वंद्व समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
  • या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
  • या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, असे लक्षात येते.
  • यासाठी 'आणि', 'व', 'अथवा', 'किंवा' यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.
द्वंद्व समासाची काही उदाहरणे

द्वंद्व समासाची उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • मिसळपाव = मिसळ आणि पाव

'मिसळपाव' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'मिसळ आणि पाव' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'मिसळ' आणि 'पाव' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'आणि' या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे या समासास 'द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • सत्यासत्य = सत्य किंवा असत्य

'सत्यासत्य' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सत्य किंवा असत्य' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'सत्य' आणि 'असत्य' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'किंवा' या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे या समासास 'द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • स्त्रीपुरूष = स्त्री व पुरूष

'स्त्रीपुरूष' हा एक सामासिक शब्द आहे, तर स्त्री व पुरूष हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'स्त्री' आणि 'पुरूष' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'व' या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे या समासास 'द्वंद्व समास' असे म्हणतात.

द्वंद्व समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
राधाकृष्णराधा आणि कृष्ण
चेंडूफळीचेंडू व फळी
आईबापआई व बाप
बहीणभाऊबहिण व भाऊ
चारपाचचार किंवा पाच
पासनापासपास अथवा नापास
मागेपुढेमागे वा पुढे
धर्माधर्मधर्म अथवा अधर्म
खरेखोटेखरे किंवा खोटे
न्यायान्यायन्याय अथवा अन्याय
वेणीफणीवेणी, फणी व इतर साज शृंगार
चटणीभाकरचटणी, भाकर व इतर पदार्थ
केरकचराकेर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
खाणेपिणेखाणे, पिणे व इतर पदार्थ
द्वंद्व समासाचे उपप्रकार

द्वंद्व समासाचे उपप्रकार

मराठी व्याकरणातील द्वंद्व समासाचे 'तीन' उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. इतरेतर द्वंद्व समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना 'आणि', 'व' यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.

इतरेतर द्वंद्व समासाविषयी अधिक माहिती

उदाहरणार्थ - मायबाप, राधाकृष्ण, चेंडूफळी, विटीदांडू इत्यादी

२. वैकल्पिक द्वंद्व समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा' यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.

उदाहरणार्थ - चारपाच, पासनापास, धर्माधर्म, खरेखोटे इत्यादी

वैकल्पिक द्वंद्व समासाविषयी अधिक माहिती

३. समाहार द्वंद्व समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केला जातो.

उदाहरणार्थ - भाजीपाला, केरकचरा, चटणीभाकर, चहापाणी इत्यादी

समाहार द्वंद्व समासाविषयी अधिक माहिती

तत्पुरूष समास इतरेतर द्वंद्व समास

This educational article was first posted on and last updated on by