मराठी व्याकरणामध्ये एकूण छत्तीस व्यंजन, बारा मुख्य स्वर आणि दोन अतिरिक्त स्वर आहेत.
स्वराची मात्रा जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडण्यात येते, तेव्हा त्यापासून प्रत्येकवेळी एक नवीन अक्षर तयार होते.
अशाप्रकारे तयार होणाऱ्या बारा अक्षरांच्या समूहाला त्या व्यंजनाची बाराखडी असे म्हणतात.
तसेच, अतिरिक्त स्वरांच्या मात्रादेखील जोडल्या तर त्यांपासून तयार होणाऱ्या चौदा अक्षरांच्या समूहाला त्या व्यंजनाची चौदाखडी असे म्हणतात.
बाराखडी
मराठी वर्णमालेतील व्यंजनांची बाराखडी