अक्षर म्हणजे मराठी भाषेतील प्रत्येक वर्णाचा उच्चार होय.
कोणत्याही स्वराला किंवा व्यंजनाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
अ हा एक स्वर असून त्याला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.
क हे एक व्यंजन असून त्याला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.
खि या वर्णाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.
पु या वर्णाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.
अक्षरांचे प्रकार
मराठी भाषेतील अक्षरांचे पुढीलप्रमाणे एकूण तीन (३) प्रकारांत विभाजन करण्यात येते.
१. मात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर
मात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला कुठल्याही प्रकारची स्वराची मात्रा लागलेली नसते.
उदाहरणार्थ – क, ख, ग इत्यादी.
२. मात्रायुक्त अक्षर
मात्रायुक्त अक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला एखाद्या स्वराची मात्रा लागलेली असते.
उदाहरणार्थ – कि, खु, गे इत्यादी.