व्यंजन म्हणजे काय?


व्यंजनांचे विविध प्रकार



‘व्यंजन’ म्हणजे काय?

ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराचे साहाय्य किंवा मदत घ्यावी लागते, त्या वर्णाला मराठी व्याकरणात व्यंजन असे म्हणतात.

अर्थात, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, त्या वर्णाला मराठी व्याकरणात व्यंजन असे म्हणतात.

मराठी भाषेतील व्यंजनांची वैशिष्ट्ये

  • व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात हे दर्शविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहिली जातात.
  • आपण जेव्हा एखाद्या व्यंजनाचा उच्चार करतो, तेव्हा त्यात हा स्वर मिसळलेला असतो.
  • उदाहरणार्थ –

    • क = क् + अ
    • ब = ब् + अ
    • च = च् + अ
  • मराठी वर्णमालेत क् पासून ळ् पर्यंतचे वर्ण ही व्यंजने आहेत.
  • मराठी व्याकरणात व्यंजनाचा उल्लेख करताना कधीकधी स्वरांत किंवा परवर्ण हि संज्ञादेखील वापरण्यात येते.

मराठी भाषेतील व्यंजने

व्यंजनांचे प्रकार

मराठी भाषेतील व्यंजनांचे पुढील प्रकारांत विभाजन करण्यात येते.

१. स्पर्श व्यंजन

क् पासून म् पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात.

स्पर्श व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ या अवयवांना स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात. त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात.

उदाहरणार्थक्, ख्, ग्, भ्, म् इत्यादी.

२. अनुनासिक

ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून होतो, त्याला अनुनासिक असे म्हणतात.

अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात, त्यामुळे त्यांना पर-सवर्ण असेही म्हणतात.

उदाहरणार्थङ्, ञ्, ण्, न्, म्

३. कठोर व्यंजन

ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याच्यात तीव्रता दिसून येते, त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात.

प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात.

उदाहरणार्थक्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, प्, फ् इत्यादी.

४. मृदू व्यंजन

ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याच्यात सौम्यता, कोमलता आणि मृदूता जाणवते, त्याला मृदू व्यंजन असे म्हणतात.

साधारणतः प्रत्येक वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन यांचा उच्चार करताना थोडासाच स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात.

उदाहरणार्थग्, घ्, ज्, झ्, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ् इत्यादी.

५. अर्धस्वर / अंतस्थ

ज्या व्यंजनाचा उच्चार जवळपास स्वरासारखाच होतो, त्याला अर्धस्वर किंवा अंतस्थ असे म्हणतात.

संधी होताना या स्वराच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर येतो.

उदाहरणार्थय्, र्, ल्, व्

६. उष्मे / घर्षक

श्, ष्, स् यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.

संधी होताना या स्वराच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर येतो.

उदाहरणार्थय्, र्, ल्, व्

७. महाप्राण व अल्पप्राण

ह् या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. अशा ह् मिसळून तयार होणाऱ्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात.

श्, ष्, स् यांचा उच्चारही वायुच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण असे म्हणतात.

एकूण १४ वर्ण महाप्राण मानले जातात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.

  • महाप्राणख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष्, स्, ह्
  • अल्पप्राणक्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण्, त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ्

This article has been first posted on and last updated on by