मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक आहे.
विरामचिन्हांशिवाय मराठी भाषेच्या अर्थाचा अनर्थ होऊ शकतो
जेव्हा आपण मराठी भाषेमध्ये लेखन करतो, तेव्हा आपण केलेले कथन हे वाचकांच्या लक्षात यावे यांसाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो.
विराम म्हणजे थांबणे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो, तेव्हा आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो.
परंतु, लिहिताना मात्र तसे करता येत नाही. त्यामुळे ही थांबण्याची किंवा विराम घेण्याची क्रिया विरामचिन्हांद्वारे दर्शविली जाते.
विरामचिन्हे म्हणजे काय?
आपण संभाषण करताना किंवा बोलताना मध्ये मध्ये थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि लिहिताना मात्र तो विराम चिन्हांनी दर्शविला जातो. अशा चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.
विरामचिन्हांचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हांचे पुढीलप्रमाणे एकूण दहा प्रकार आहेत.
५. अवतरणचिन्ह
एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास ( ' ) किंवा ( " ) या चिन्हाचा उपयोग केला जातो.