अर्धविराम
( ; ) हे अर्धविरामाचे चिन्ह आहे.
अर्धविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात अर्धविरामाचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो.
ज्या दोन वाक्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध नाही, अशी वाक्ये जेव्हा एकाच मोठ्या वाक्यामध्ये वापरली जातात, तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांच्या मध्ये अर्धविरामाचे चिन्ह वापरले जाते.
एखाद्या संयुक्त वाक्यातील समान वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह वापरले जाते.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली असता त्या वाक्यांच्या मध्ये अर्धविरामाचे चिन्ह वापरले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
राधाने पुस्तक तर आणलं होतं; पण वही आणायला मात्र ती विसरली.
वरील वाक्यामध्ये दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी पण हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे.
हि वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, हे दर्शविण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह ( ; ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
मी बाजारात जाते; तोवर तू अभ्यास कर.
वरील संयुक्त वाक्यामध्ये दोन छोटी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह ( ; ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
मी पंखा पुसते; तोपर्यंत तू ओटा आवरून घे.
वरील संयुक्त वाक्यामध्ये दोन छोटी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह ( ; ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
गार्गी हुशार आहे; पण ती अभ्यास करत नाही.
वरील वाक्यामध्ये दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी पण हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे.
हि वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, हे दर्शविण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह ( ; ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
मी रियाची खूप वाट बघितली; पण ती आली नाही.
वरील वाक्यामध्ये दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी पण हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे.
हि वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, हे दर्शविण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह ( ; ) वापरले आहे.