'वाक्य' म्हणजे काय?
'वाक्य' म्हणजे काय?
एखाद्या शब्दांच्या समुच्चयाला जर पूर्ण अर्थ प्राप्त होत असेल, तर त्याला आपण 'वाक्य' असे म्हणतो.
काही नियम
वाक्यासंबंधीचे काही नियम
- वाक्य तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक शब्दांचा समूह असणे आवश्यक आहे.
- आपण तयार केलेल्या वाक्यामधून संपूर्ण अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ,
'रोहित शाळेत गेला.' हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे.
मात्र, 'रोहित शाळेत' इतकंच वाक्य तयार केलं, तर त्यावरून काहीच अर्थबोध होत नाही.
म्हणूनच, आपण तयार केलेले वाक्य अर्थपूर्ण असणे आवश्यक असते.
वाक्याचे प्रकार
अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार
अर्थावरून वाक्याचे एकूण 'सहा' प्रकार पडतात.
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- होकारार्थी वाक्य
- नकारार्थी वाक्य
अर्थावरून वाक्यप्रकारांविषयी अधिक माहिती
स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार
स्वरूपावरून वाक्याचे एकूण 'तीन' प्रकार पडतात.
- केवल वाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य