मराठी व्याकरणातील अर्थावरून पडणारे वाक्याचे सहा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. विधानार्थी वाक्य
ज्या वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
२. प्रश्नार्थी वाक्य
ज्या वाक्यात वाक्याच्या कर्त्याने एखादा प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
३. उद्गारार्थी वाक्य
ज्या वाक्यामधून एखाद्या भावनेचा उद्गार व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
४. आज्ञार्थी वाक्य
ज्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
५. होकारार्थी वाक्य
ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो, त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात.
६. नकारार्थी वाक्य
ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो, त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.