आज्ञार्थी वाक्य
मराठी वाक्यामध्ये जर एखाद्या आज्ञेचा उल्लेख होत असेल, तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
आज्ञार्थी वाक्याची काही वैशिष्ट्ये
- आज्ञार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याने केलेल्या एखाद्या आज्ञेचा उल्लेख होतो. इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा उद्गार व्यक्त होत नाही.
- आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम (.) हे विरामचिन्ह वापरलेले असते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
ताठ बसा.
या वाक्यामधून केवळ कर्त्याने केलेली बसण्याची आज्ञा व्यक्त होत आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा उद्गार व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
रांगेमध्ये उभे राहा.
या वाक्यामधून केवळ कर्त्याने केलेली उभे राहण्याची आज्ञा व्यक्त होत आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा उद्गार व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
वाहतूकीचे नियम पाळा.
या वाक्यामधून केवळ कर्त्याने केलेली नियम पाळण्याची आज्ञा व्यक्त होत आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा उद्गार व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, असे समजावे.