अवतरणचिन्ह

विरामचिन्हांचे प्रकार

मराठी व्याकरणातील एखाद्या शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर द्यावयाचा असल्यास अवतरणचिन्हाचा उपयोग केला जातो.

'अवतरणचिन्ह' म्हणजे काय?

'अवतरणचिन्ह' म्हणजे काय?

( ‘ ’ ) आणि ( “ ” ) ही दोन्हीही अवतरणचिन्हे आहेत.

अवतरणचिन्हे ही मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा एक भाग आहेत.

मराठी व्याकरणातील एखाद्या शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर द्यावयाचा असल्यास अवतरणचिन्हाचा उपयोग केला जातो.

तसेच, दुसऱ्या व्यक्तीचे विचार जसेच्या तसे लिहावयाचे असल्यास अवतरणचिन्हाचा उपयोग केला जातो.

मराठी व्याकरणामध्ये अवतरणचिन्हांचे एकूण 'दोन' प्रकार आहेत.

एकेरी अवतरणचिन्ह

१. एकेरी अवतरणचिन्ह

मराठी वाक्यातील एखादा शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर द्यावयाचा असल्यास एकेरी अवतरणचिन्हाचा ( ‘ ’ ) उपयोग केला जातो.

ज्या शब्द किंवा शब्दसमूहावर जोर द्यावयाचा असतो, त्याच्या सुरूवातीला आणि शेवटी अशा दोन्ही बाजूस एकेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.

एकेरी अवतरणचिन्हाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • सिंहगड हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे.

वरील वाक्यामध्ये 'सिंहगड' या शब्दावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरणचिन्ह ( ‘ ’ ) वापरले आहे.

उदाहरण क्र. २
  • जयपूरला गुलाबी शहर असेही म्हणतात.

वरील वाक्यामध्ये 'गुलाबी शहर' या शब्दसमूहावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरणचिन्ह ( ‘ ’ ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ३
  • आग्रा शहरामध्ये ताजमहाल आहे.

वरील वाक्यामध्ये 'ताजमहाल' या शब्दावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरणचिन्ह ( ‘ ’ ) वापरले आहे.

दुहेरी अवतरणचिन्ह

२. दुहेरी अवतरणचिन्ह

मराठी व्याकरणामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे विचार किंवा त्याने बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहावयाचे असल्यास दुहेरी अवतरणचिन्हाचा ( “ ” ) उपयोग केला जातो.

जे विचार किंवा वाक्य लिहावयाचे असते, त्याच्या सुरूवातीला आणि शेवटी अशा दोन्ही बाजूस दुहेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.

दुहेरी अवतरणचिन्हाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

तो म्हणाला, उद्या मी कामावर येणार नाही.

वरील वाक्यामध्ये उद्या मी कामावर येणार नाही हे वाक्य जसेच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह ( “ ” ) वापरले आहे.

उदाहरण क्र. २

गुरूजी म्हणाले, दोन दिवसांनी परीक्षेचा निकाल आहे.

वरील वाक्यामध्ये दोन दिवसांनी परीक्षेचा निकाल आहे हे वाक्य जसेच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह ( “ ” ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ३

बाबा म्हणाले, आपण यावर्षी दिवाळीला घरीच कंदील बनवूया.

वरील वाक्यामध्ये आपण यावर्षी दिवाळीला घरीच कंदील बनवूया हे वाक्य जसेच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह ( “ ” ) वापरले आहे.

प्रश्नचिन्ह अर्धविराम

This educational article was first posted on and last updated on by