अपूर्णविराम

विरामचिन्हांचे प्रकार

मराठी वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविरामाचा उपयोग केला जातो.

'अपूर्णविराम' म्हणजे काय?

'अपूर्णविराम' म्हणजे काय?

( : ) हे अपूर्णविरामाचे चिन्ह आहे.

अपूर्णविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.

मराठी वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविरामाचा उपयोग केला जातो.

उदाहरणे

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १
  • दहापेक्षा लहान विषम संख्या पुढीलप्रमाणे आहेत : १, ३, ५, ७, ९

वरील वाक्यामध्ये दहापेक्षा लहान विषम संख्यांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.

उदाहरण क्र. २
  • सहामाही परीक्षेत आठवीतील पुढील क्रमांकाचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत : ५६, ४५, १२०, ६०, ९५

वरील वाक्यामध्ये आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ३
  • खडकांचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : अग्निजन्य, स्तरित, रूपांतरित

वरील वाक्यामध्ये खडकांच्या प्रकारांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ४
  • माणसाच्या मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे आहेत : अन्न, वस्त्र, निवारा

वरील वाक्यामध्ये माणसाच्या मूलभूत गरजांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ५
  • क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तीन देश पुढीलप्रमाणे आहेत : रशिया, कॅनडा, अमेरिका

वरील वाक्यामध्ये क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठ्या तीन देशांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.

स्वल्पविराम प्रश्नचिन्ह

This educational article was first posted on and last updated on by