पूर्णविराम

विरामचिन्हांचे प्रकार

मराठी वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी 'पूर्णविराम' वापरले जाते.

'पूर्णविराम' म्हणजे काय?

'पूर्णविराम' म्हणजे काय?

(.) हे पूर्णविरामाचे चिन्ह आहे.

 

'पूर्णविराम' हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.

मराठी वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी 'पूर्णविराम' वापरले जाते.

उदाहरणे

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १
  • आज शाळा सात वाजता आहे.
उदाहरण क्र. २
  • मी उद्या गावाला जाणार आहे.

उदाहरण क्र. ३

  • तो रोज व्यायाम करत नाही.
उदाहरण क्र. ४
  • ताईने वर पाहिले.
उदाहरण क्र. ५
  • आमच्या गावी आंब्याची खूप झाडं आहेत.

वरील सर्व उदाहरणांमध्ये वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी 'पूर्णविराम' (.) हे चिन्ह वापरलेले आहे.

विरामचिन्हे स्वल्पविराम

This educational article was first posted on and last updated on by