संयोगचिन्ह
( - ) हे संयोगचिन्ह आहे.
संयोगचिन्ह हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात दोन शब्द जोडण्यासाठी किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास तो जोडून लिहिण्यासाठी संयोगचिन्ह वापरले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सुनीताकडे भरपूर भांडी - कुंडी आहेत.
वरील वाक्यामध्ये भांडी आणि कुंडी हे दोन शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
घरामध्ये कधीही भांडण - तंटा नसावा.
वरील वाक्यामध्ये भांडण आणि तंटा हे दोन शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
त्यांनी कालच नवीन टेबल - खुर्च्या विकत आणल्या.
वरील वाक्यामध्ये टेबल आणि खुर्च्या हे दोन शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
माझा भाऊ काम करत असलेला कारखाना खूपच आड -
बाजूला आहे.
वरील वाक्यामध्ये आडबाजूला हा शब्द लिहिण्यासाठी ओळ अपुरी पडल्यामुळे ओळीच्या शेवटी संयोगचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
आमच्या स्वयंपाकघरामध्ये आम्ही सर्व प्रकारची अद्ययावत उप -
करणे वापरत आहोत.
वरील वाक्यामध्ये उपकरणे हा शब्द लिहिण्यासाठी ओळ अपुरी पडल्यामुळे ओळीच्या शेवटी संयोगचिन्ह ( - ) वापरले आहे.