अपसरणचिन्ह
( – ) हे अपसरणचिन्ह आहे.
अपसरणचिन्ह हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास तो मुद्दा लिहून त्यापुढे अपसरणचिन्ह वापरले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
शेती – शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील ७०% जनता शेतीवर अवलंबून आहे.
वरील वाक्यामध्ये शेती या शब्दानंतर त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपसरणचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
संस्कृत – संस्कृत ही विश्वातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिला देववाणी असे देखील म्हणतात.
वरील वाक्यामध्ये शेती या शब्दानंतर त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपसरणचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
वाचनाचे फायदे – वाचनाचे फायदे अगणित आहेत. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते. तसेच, ज्ञानात भर पडते.
वरील वाक्यामध्ये वाचनाचे फायदे या मुद्द्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपसरणचिन्ह ( - ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
माझे आवडते लेखक – माझे आवडते लेखक आहेत 'व.पु.काळे', त्यांचे संपूर्ण नाव 'वसंत पुरूषोत्तम काळे' असे आहे. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
वरील वाक्यामध्ये माझे आवडते लेखक या मुद्द्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपसरणचिन्ह ( - ) वापरले आहे.