स्वल्पविराम


विरामचिन्हांचे प्रकार



स्वल्पविराम

( , ) हे स्वल्पविरामाचे चिन्ह आहे.

स्वल्पविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.

मराठी वाक्यात स्वल्पविरामाचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो.

एकाच वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आले असता, तसेच एकाच जातीचे अनेक शब्द आले असता, अशा शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले जाते.

वाक्याच्या सुरूवातीला संबोधन वापरलेले असेल, तर अशा संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

घरामध्ये चवळी, मटकी, मूग ही कडधान्य आहेत.

वरील वाक्यामध्ये चवळी, मटकी आणि मूग या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.

उदाहरण क्र. २

आमच्या बागेत आंबा, चिकू, पेरू ही फळझाडे आहेत.

वरील वाक्यामध्ये आंबा, चिकू आणि पेरू या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ३

त्यांच्या लग्नसमारंभाला मामा, काका, मावशी, आत्या असे सर्वजण उपस्थित होते.

वरील वाक्यामध्ये मामा, काका, मावशी आणि आत्या या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ४

विद्यार्थी मित्रांनो, उद्या शाळेला सुट्टी आहे.

वरील वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या वाक्याच्या सुरूवातीला आलेल्या संबोधनानंतर स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ५

गुरूजी, हे समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू?

वरील वाक्यामध्ये गुरूजी या वाक्याच्या सुरूवातीला आलेल्या संबोधनानंतर स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.

This article has been first posted on and last updated on by