बऱ्याच वेळा एखाद्या वाक्यामध्ये किंवा वाक्यसमूहामध्ये एखाद्या नामाचा वारंवार उच्चार करावा लागतो.
उदाहरणार्थ,
गोरक्ष सकाळी उठतो.
गोरक्ष शाळेत जातो.
गोरक्ष अभ्यास करतो.वरील वाक्यसमूहामध्ये गोरक्ष या नामाचा वारंवार उच्चार केलेला आहे.
हा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग करण्यात येतो.
सर्वनाम म्हणजे काय?
वाक्यातील किंवा वाक्यसमूहातील वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो, त्याला सर्वनाम असे म्हणतात.
वरील वाक्यांमध्ये प्रत्येक वेळी गोरक्ष या नामाऐवजी तो या सर्वनामाचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येऊ शकतो.
गोरक्ष सकाळी उठतो.
तो शाळेत जातो.
तो अभ्यास करतो.
काही नेहमीच्या वापरातील सर्वनामे –
तूमीतोहाआपणस्वतःत्यालातिनेकायकोणालाकोणकुठे
सर्वनामाचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे पुढीलप्रमाणे एकूण सहा मुख्य प्रकार आहेत.
१. पुरूषवाचक सर्वनाम
पुरूषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला पुरूषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
२. दर्शक सर्वनाम
एखादी जवळची किंवा दूरची वस्तू अथवा व्यक्ती दर्शविण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो.
३. संबंधी सर्वनाम
एखाद्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
४. प्रश्नार्थक सर्वनाम
एखादा प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
५. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचा वाक्यातील अर्थ हा अनिश्चित असतो.