काळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापदाच्या असे म्हणतात.
या क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया कधी घडते, याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात.
काळाचे प्रकार
मराठी व्याकरणामधील काळाचे तीन मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. वर्तमानकाळ
मराठी वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून घडणारी क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते आहे, असा जेव्हा बोध होतो, तेव्हा त्या काळाला वर्तमानकाळ असे म्हणतात.
मराठी व्याकरणामधील वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१.२ चालू / अपूर्ण वर्तमानकाळ
चालू वर्तमानकाळामध्ये क्रिया वर्तमानात सद्यस्थितीत चालू किंवा अपूर्ण असते.
२. भूतकाळ
मराठी वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून घडणारी क्रिया पूर्वी केव्हातरी घडून गेलेली आहे, असा जेव्हा बोध होतो, तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात.
मराठी व्याकरणामधील भूतकाळाचे चार उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
२.२ चालू / अपूर्ण भूतकाळ
चालू भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी केव्हातरी अल्पकाळ चालू किंवा अपूर्ण असते.
३. भविष्यकाळ
मराठी वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून घडणारी क्रिया भविष्यात पुढे केव्हातरी घडणार आहे, असा जेव्हा बोध होतो, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
मराठी व्याकरणामधील भविष्यकाळाचे चार उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
३.२ चालू / अपूर्ण भविष्यकाळ
अपूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया भविष्यात पुढे केव्हातरी चालू असते असा बोध होतो.
३.३ पूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया भविष्यात पुढे केव्हातरी पूर्ण झालेली असेल बोध होतो.