'रीती भविष्यकाळ' म्हणजे काय?
'रीती भविष्यकाळ' म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया भविष्यात नेहमी घडणारी असेल, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ असतो.
वाक्यातील उपयोग
'रीती भविष्यकाळ' याचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- ती दररोज रोजनिशी लिहित जाईल.
या वाक्यामध्ये कर्त्याची रोजनिशी लिहिण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा 'रीती भविष्यकाळ' समजावा.
उदाहरण क्र. २
- विवेक नियमितपणे गाडी चालवायला शिकणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची गाडी शिकण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा 'रीती भविष्यकाळ' समजावा.
उदाहरण क्र. ३
- राजेश दररोज पाढे म्हणत जाईल.
या वाक्यामध्ये कर्त्याची पाढे म्हणण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा 'रीती भविष्यकाळ' समजावा.
उदाहरण क्र. ४
- दिपाली दररोज व्यायाम करणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची व्यायाम करण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा 'रीती भविष्यकाळ' समजावा.