चालू / अपूर्ण वर्तमानकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया सध्या वर्तमानामध्ये चालू किंवा अपूर्ण असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा चालू वर्तमानकाळ किंवा अपूर्ण वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
गोरक्ष अभ्यास करत आहे.
या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया वर्तमानात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण वर्तमानकाळ समजावा.
या वाक्यामध्ये आहे हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू आहे असे दर्शविते.
उदाहरण क्र. २
विवेक चित्र काढत आहे.
या वाक्यामध्ये चित्र काढण्याची क्रिया वर्तमानात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण वर्तमानकाळ समजावा.
या वाक्यामध्ये आहे हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू आहे असे दर्शविते.
उदाहरण क्र. ३
प्रिया चहा पित आहे.
या वाक्यामध्ये चहा पिण्याची क्रिया वर्तमानात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण वर्तमानकाळ समजावा.
या वाक्यामध्ये आहे हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू आहे असे दर्शविते.
उदाहरण क्र. ४
रिया नृत्य करत आहे.
या वाक्यामध्ये नृत्य करण्याची क्रिया वर्तमानात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण वर्तमानकाळ समजावा.
या वाक्यामध्ये आहे हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू आहे असे दर्शविते.
उदाहरण क्र. ५
राणी पुस्तक वाचत आहे.
या वाक्यामध्ये पुस्तक वाचण्याची क्रिया वर्तमानात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो.