पूर्ण वर्तमानकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया वर्तमानात नुकतीच पूर्ण झालेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
अनिताने अभ्यास केला आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची अभ्यास करण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
तिने चित्र काढले आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची चित्र काढण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
मी आताच जेवण बनवले आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची जेवण बनवण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
तिने तिचे काम संपवले आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची काम संपवण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ५
सुबोधने आंबा खाल्ला आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची आंबा खाण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ समजावा.