वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'काळजाला भिडणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'काळजाला भिडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- मनापर्यंत पोचणे
- हृदयाला साद घालणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- लतादीदींची गाणी ही काळजाला भिडतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की लतादीदींची गाणी मनापर्यंत पोचणारी असतात.
हे दर्शविण्यासाठी मनापर्यंत पोचणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- सुरेश भटांच्या कविता या थेट काळजाला भिडतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सुरेश भटांच्या कविता थेट हृदयाला साद घालणाऱ्या असतात.
हे दर्शविण्यासाठी हृदयाला साद घालणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'काळजाला भिडणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- श्यामची आई हे सानेगुरुजींचे पुस्तक थेट काळजाला भिडते.
- दत्तक घेतलेल्या किरणने जेव्हा मला पहिल्यांदा आई अशी हाक मारली, तेव्हा ती हाक माझ्या काळजाला भिडली.
- नवख्या कलाकाराने वठवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका थेट काळजाला भिडली.