शब्दसंपत्ती


अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे


शब्दसंपत्ती – विषय सूची

शब्दसंपत्ती

‘शब्दसंपत्ती’ या विषयामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात.

शब्दसंपत्तीचे काही नियम पुढीलप्रमाणे आहेत –

  • दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
  • अक्षरांना कुठेही अतिरिक्त काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार असू नये.
  • तयार केलेल्या शब्दाला अर्थ असणे आवश्यक आहे.

शब्दसंपत्तीची उदाहरणे,

उदाहरण क्र. १

ऊनपाऊस

ऊनपाऊस या शब्दापासून ऊन, पाऊस, ऊस आणि नऊ हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात.

उदाहरण क्र. २

एकनाथ

एकनाथ या शब्दापासून एक, नाथ आणि नाक हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात.

उदाहरण क्र. ३

महाभारत

महाभारत या शब्दापासून भारत, हात, तर, मत, हार, भात आणि भार हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात.

शब्दसंपत्तीची इतर काही उदाहरणे

मूळ शब्द तयार होणारे अर्थपूर्ण शब्द
अक्षरभारती अक्षर, भारती, भार, रती, क्षर
अभ्यासक्रम अभ्यास, क्रम, सम
आदित्यनाथ आदित्य, आदि, नाथ
आधारपूरक आधार, पूर, पूरक, धार, धाक
आरामशीर आराम, राम, मर, शीर, राशी
ऊनसावली ऊन, सावली, नऊ, वली, सान
एकवटलेली एक, वट
कपाट पाट, कट, टक, पाक
कर्तृत्ववान कर्तृत्व, वाक, नवा
कामगार काम, गार, मका, मर
काशीराम काशी, राम, काम
कोल्हापूर कोल्हा, पूर, कोर
क्रियाविशेषण क्रिया, विशेष, विशेषण, शेण, शेष
खजिनदार दार, नख, नर, दान
गणपती गण, पती, गती, पण
चाळीसगाव चाळीस, गाव, सळी
चौकशीपत्र चौक, चौकशी, कशी, पत्र, कप
तंत्रज्ञान तंत्र, ज्ञान, नत्र
तुकाराम राम, काम, तुरा, मका
त्रिभुवन त्रि, भुवन, वन
दिवाणखाना दिवाण, वाण, दिवा, खाण
नागरिकशास्त्र नागरिक, शास्त्र, नाग, नाक
नोंदपुस्तिका नोंद, पुस्तिका
प्रवासवर्णन प्रवास, वर्णन, वास, सन, नस, वन
बालपण बाल, पण, बाप, बाण
भारतीय भार, भारती, तीर
मातृभूमी मातृ, भूमी, भू
मूल्यमापन मूल्य, मापन, मान
मेघरहित मेघ, रहित, हित, घर, रत, तर
रखवालदार दार, खवा, वाल, वार
रविकांत रवि, कांत, तर
रामदास राम, दास, दाम, सम, रास
लताबाई लता, बाई, ताई, बाल
वर्तमानपत्र वर्तमान, पत्र, माप, मान, वन, नत्र
विश्वनाथ विश्व, नाथ
व्यवसाय व्यय, साय, वसा, वय
व्याकरण कर, रण, कण
संजीवन जीवन, वन, जीव
समुच्चयबोधक समुच्चय, बोध, कस, धस
सिंहावलोकन हाव, लोक, वन, हाक

This article has been first posted on and last updated on by