वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'गावी नसणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'गावी नसणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- अजिबात माहित नसणे
- बेफिकीर असणे
- ठाऊक नसणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- पुढच्या आठवड्यात ओमची परिक्षा आहे, हे त्याच्या गावी नव्हते.
वरील वाक्यात असे दिसते की पुढच्या आठवड्यात ओमची परिक्षा आहे, याबाबत तो बेफिकीर होता.
हे दर्शविण्यासाठी ‘बेफिकीर असणे’ या ऐवजी ‘गावी नसणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- आपण क्रिकेटच्या आगामी संघात नाही, हे सुरेशच्या गावी नव्हते.
वरील वाक्यात असे दिसते की आपण क्रिकेटच्या आगामी संघात नाही, हे सुरेशला अजिबात माहित नव्हते.
हे दर्शविण्यासाठी ‘अजिबात माहित नसणे’ या ऐवजी ‘गावी नसणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'गावी नसणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- आई आता या जगात नाही, हे तान्ह्या बाळाच्या गावी नव्हते.
- लहान मुलांना सतत मोबाईल देण्यामुळे मुलांच्या मानसिक व बौद्धिक प्रगतीला खीळ बसते, हे बऱ्याच पालकांच्या गावी नसते.