अभाव असणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग



मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

‘अभाव असणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

कमतरता असणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

दुष्काळी भागात पाण्याचा अभाव आहे.

वरील वाक्यात असे दिसते की दुष्काळी भागात पाण्याची कमतरता आहे.

हे दर्शविण्यासाठी ‘कमतरता असणे’ या ऐवजी ‘अभाव असणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

संस्थेच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता.

वरील वाक्यात असे दिसते की संस्थेच्या कारभारात समन्वयाची पूर्ण कमतरता होती.

हे दर्शविण्यासाठी ‘कमतरता असणे’ या ऐवजी ‘अभाव असणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

ग्रंथालयात अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा अभाव होता.

वरील वाक्यात असे दिसते की ग्रंथालयात अर्थशास्त्रावरील पुस्तकाची कमतरता होती.

हे दर्शविण्यासाठी ‘कमतरता असणे’ या ऐवजी ‘अभाव असणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

‘अभाव असणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • आत्मविश्वासाचा अभाव असणे ही कोणत्याही कार्यातली प्रमुख अडचण आहे.

  • आजकाल शेजाऱ्यांमध्येच काय तर आप्तस्वकीय यांच्यासोबतसुद्धा संवादाचा अभाव आहे.

This article has been first posted on and last updated on by