वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'आनंद गगनात न मावणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'आनंद गगनात न मावणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- खूप आनंद होणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- निबंध स्पर्धेत रियाचा पहिला क्रमांक आला आहे हे जाहीर होताच रियाचा आनंद गगनात मावेना.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की निबंध स्पर्धेत रियाचा पहिला क्रमांक आला आहे हे जाहीर होताच तिला खूप आनंद झाला.
हे दर्शविण्यासाठी 'खूप आनंद होणे' या ऐवजी 'आनंद गगनात न मावणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- यावर्षी बाबा परदेशात फिरायला नेणार हे कळताच राधिकाचा आनंद गगनात मावेना.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की यावर्षी बाबा परदेशात फिरायला नेणार हे कळताच राधिकाला खूप आनंद झाला.
हे दर्शविण्यासाठी 'खूप आनंद होणे' या ऐवजी 'आनंद गगनात न मावणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
- आपल्या शाळेच्या मुलांचे शिक्षकांबद्दलचे गौरवोद्गार ऐकून शिक्षकांचा आनंद गगनात मावेना.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की आपल्या शाळेच्या मुलांचे शिक्षकांबद्दलचे गौरवोद्गार ऐकून शिक्षकांना खूप आनंद झाला.
हे दर्शविण्यासाठी 'खूप आनंद होणे' या ऐवजी 'आनंद गगनात न मावणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'आनंद गगनात न मावणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- सुनिता स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याने तिच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना.
- आईने सोनूला नवीन कपडे आणले आहेत हे ऐकताच तिचा आनंद गगनात मावेना.