आभाळ कोसळणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग



मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

‘आभाळ कोसळणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

  • फार मोठा अनर्थ ओढवणे
  • फार मोठे संकट येणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

जयंतरावांच्या जाण्याने अनाथाश्रमाच्या मुलांवर जणू काही आभाळच कोसळले.

वरील वाक्यात असे दिसते की जयंतरावांच्या जाण्याने अनाथाश्रमाच्या मुलांवर फार मोठे संकट आले.

हे दर्शविण्यासाठी ‘फार मोठे संकट येणे’ या ऐवजी ‘आभाळ कोसळणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

महापूरामुळे जनतेवर आभाळ कोसळले.

वरील वाक्यात असे दिसते की महापूरामुळे जनतेवर फार मोठा अनर्थ ओढवला.

हे दर्शविण्यासाठी ‘फार मोठा अनर्थ ओढवणे’ या ऐवजी ‘आभाळ कोसळणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

दहावीला नव्वद टक्के नाही मिळाले तर काही आभाळ कोसळणार नाही.

वरील वाक्यात असे सांगावयाचे आहे की दहावीला नव्वद टक्के नाही मिळाले तर फार मोठा अनर्थ ओढवत नाही.

हे दर्शविण्यासाठी ‘फार मोठा अनर्थ ओढवणे’ या ऐवजी ‘आभाळ कोसळणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

या वाक्यामध्ये वाक्य्प्रचाराचा उपयोग नकारार्थी केलेला आहे.

‘आभाळ कोसळणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • एका मजूराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते.

  • लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयश आले म्हणून काही आभाळ कोसळत नाही.

  • आईच्या जाण्याने आमच्यावर दुःखाचे आभाळ कोसळले.

  • आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय देऊन मी ठामपणे उभा राहीन’, असे लोकमान्य टिळक म्हणत.

This article has been first posted on and last updated on by