वचन


एकवचन आणि अनेकवचन


‘वचन’ म्हणजे काय?

नाम, सर्वनाम, विशेषण तसेच क्रियापद यांच्या स्वरूपावरून कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तू या एक आहेत किंवा एकापेक्षा अधिक आहेत, याचा बोध ज्यामुळे होतो, त्याला ‘वचन’ असे म्हणतात.

एखादी व्यक्ती किंवा वस्तू या एक आहेत किंवा एकापेक्षा अधिक आहेत, या संख्यावाचक गुणधर्मास मराठी व्याकरणामध्ये ‘वचन’ असे म्हणतात.

वचनाचे प्रकार

मराठी व्याकरणामध्ये वचनाचे एकवचन आणि अनेकवचन (बहुवचन) असे दोन प्रकार आहेत.

एकवचन

एखाद्या शब्दामधून जेव्हा फक्त एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात.

अनेकवचन (बहुवचन)

एखाद्या शब्दामधून जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा किंवा वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्यास अनेकवचन असे म्हणतात.

अनेकवचनासंदर्भात कधीकधी बहुवचन हि संज्ञादेखील वापरली जाते.

एकवचन आणि अनेकवचन वेगवेगळी असणारी उदाहरणे,

एकवचन अनेकवचन
(एक) आकृती (अनेक) आकृत्या
(एक) आंबा (अनेक) आंबे
(एक) ओढणी (अनेक) ओढण्या
(एक) काच (अनेक) काचा
(एक) कावळा (अनेक) कावळे
(एक) काटा (अनेक) काटे
(एक) कुत्रा (अनेक) कुत्रे
(एक) केळे (अनेक) केळी
(एक) कोल्हा (अनेक) कोल्हे
(एक) खुर्ची (अनेक) खुर्च्या
(एक) खूण (अनेक) खुणा
(एक) घोडा (अनेक) घोडे
(एक) चांदणी (अनेक) चांदण्या
(एक) चिमणी (अनेक) चिमण्या
(एक) चिंच (अनेक) चिंचा
(एक) चूक (अनेक) चुका
(एक) जखम (अनेक) जखमा
(एक) तारीख (अनेक) तारखा
(एक) दरवाजा (अनेक) दरवाजे
(एक) दिवा (अनेक) दिवे
(एक) दोरा (अनेक) दोरे
(एक) नदी (अनेक) नद्या
(एक) पडदा (अनेक) पडदे
(एक) पिशवी (अनेक) पिशव्या
(एक) पुस्तक (अनेक) पुस्तके
(एक) पेढा (अनेक) पेढे
(एक) पंखा (अनेक) पंखे
(एक) फळ (अनेक) फळे
(एक) फूल (अनेक) फुले
(एक) बगळा (अनेक) बगळे
(एक) बाग (अनेक) बागा
(एक) बंदूक (अनेक) बंदुका
(एक) भाकरी (अनेक) भाकऱ्या
(एक) भिंत (अनेक) भिंती
(एक) मगर (अनेक) मगरी
(एक) मळा (अनेक) मळे
(एक) मासा (अनेक) मासे
(एक) मुलगा (अनेक) मुले
(एक) मुलगी (अनेक) मुली
(एक) म्हैस (अनेक) म्हशी
(एक) रस्ता (अनेक) रस्ते
(एक) राजा (अनेक) राजे
(एक) रेडा (अनेक) रेडे
(एक) रांग (अनेक) रांगा
(एक) लाट (अनेक) लाटा
(एक) लांडगा (अनेक) लांडगे
(एक) वही (अनेक) वह्या
(एक) वाडी (अनेक) वाड्या
(एक) वात (अनेक) वाती
(एक) विहीर (अनेक) विहिरी
(एक) वीट (अनेक) विटा
(एक) वेळ (अनेक) वेळा
(एक) शिडी (अनेक) शिड्या
(एक) शीर (अनेक) शिरा
(एक) ससा (अनेक) ससे
(एक) हाक (अनेक) हाका

काही शब्दांचे एकवचन आणि अनेकवचन हे सारखेच असते.

एकवचन आणि अनेकवचन सारखेच असणारी उदाहरणे,

एकवचन अनेकवचन
(एक) उंदीर (अनेक) उंदीर
(एक) कन्या (अनेक) कन्या
(एक) कवी (अनेक) कवी
(एक) कागद (अनेक) कागद
(एक) केस (अनेक) केस
(एक) गहू (अनेक) गहू
(एक) चहा (अनेक) चहा
(एक) चिकू (अनेक) चिकू
(एक) चेंडू (अनेक) चेंडू
(एक) तेली (अनेक) तेली
(एक) दगड (अनेक) दगड
(एक) दिशा (अनेक) दिशा
(एक) देव (अनेक) देव
(एक) देश (अनेक) देश
(एक) न्हावी (अनेक) न्हावी
(एक) पलंग (अनेक) पलंग
(एक) पक्षी (अनेक) पक्षी
(एक) पाय (अनेक) पाय
(एक) पूजा (अनेक) पूजा
(एक) बैल (अनेक) बैल
(एक) भाषा (अनेक) भाषा
(एक) रूमाल (अनेक) रूमाल
(एक) लेखक (अनेक) लेखक
(एक) वाणी (अनेक) वाणी
(एक) विद्या (अनेक) विद्या
(एक) विद्यार्थी (अनेक) विद्यार्थी
(एक) वीणा (अनेक) वीणा
(एक) वेल (अनेक) वेल
(एक) शाळा (अनेक) शाळा
(एक) सफरचंद (अनेक) सफरचंद
(एक) सभा (अनेक) सभा
(एक) सिंह (अनेक) सिंह
(एक) संत (अनेक) संत
(एक) हत्ती (अनेक) हत्ती
(एक) हार (अनेक) हार

This article has been first posted on and last updated on by