कर्मधारय समास

तत्पुरूष समासाचे प्रकार

ज्या तत्पुरूष समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात, त्या समासाला 'कर्मधारय समास' असे म्हणतात.

'कर्मधारय समास' म्हणजे काय?

ज्या तत्पुरूष समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात, त्या समासाला 'कर्मधारय समास' असे म्हणतात.

कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये

कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये

  • कर्मधारय समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
  • या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो.
  • या समासातील दोन्ही पदांचा संबंध कधीकधी उपमान आणि उपमेय अशा स्वरूपाचा देखील असतो.
  • या समासामध्ये कधी पूर्वपद विशेषण असते, तर कधी उत्तरपद विशेषण असते.
कर्मधारय समासाची काही उदाहरणे

कर्मधारय समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
महादेवमहान असा देव
नीलांबरनील असे अंबर
रक्तचंदनरक्तासारखे चंदन
महाराष्ट्रमहान असे राष्ट्र
तांबडीमातीतांबडी असलेली माती
लालभडकलाल असा भडक
पांढराशुभ्रपांढरा असा शुभ्र
काळाकुट्टकाळा असा कुट्ट
श्यामसुंदरश्याम असा सुंदर
हिरवागारहिरवा असा गार
घननीलनिळा असा घन
पुरूषोत्तमउत्तम असा पुरूष
रामदयाळदयाळू असा राम
सर्वोत्तमसर्वांमधील उत्तम
विषयांतरअन्य विषय
मातृमुखीमातेसारखे मुख असणारा
रेशीमधागारेशमासारखा धागा
कमलनयनकमळासारखे नयन
साखरपेरणीसाखरेसारखी पेरणी
चंद्रमुखीचंद्रासारखे मुख असणारा
सुर्यमुखीसूर्यासारखे मुख असणारा
पितृमुखीपित्यासारखे मुख असणारा
पदकमलकमळासारखे पाय
नरसिंहसिंहासारखा नर
मुखचंद्रचंद्रासारखे मुख
बोधामृतबोधरूपी अमृत
कन्यारत्नकन्या हेच रत्न
पुत्ररत्नपुत्र हेच रत्न
विद्याधनविद्या हेच धन
काव्यामृतकाव्यरूपी अमृत
ज्ञानामृतज्ञानरूपी अमृत
कर्मधारय समासाचे उपप्रकार

कर्मधारय समासाचे उपप्रकार

मराठी व्याकरणातील कर्मधारय समासाचे 'सहा' उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. विशेषण – पूर्वपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील पहिले पद हे विशेषण असते.

उदाहरणार्थ - महादेव, नीलांबर, महाराष्ट्र, रक्तचंदन, तांबडीमाती इत्यादी

विशेषण – पूर्वपद समासाविषयी अधिक माहिती

२. विशेषण – उत्तरपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील दुसरे पद हे विशेषण असते.

उदाहरणार्थ - घननील, पुरूषोत्तम, भाषांतर, विषयांतर, सर्वोत्तम इत्यादी

विशेषण – उत्तरपद समासाविषयी अधिक माहिती

३. विशेषण – उभयपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील दोन्हीही पदे विशेषण असतात.

उदाहरणार्थ - लालभडक, पांढराशुभ्र, हिरवागार, काळाकुट्ट, काळाभोर इत्यादी

विशेषण – उभयपद समासाविषयी अधिक माहिती

४. उपमान – पूर्वपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील पहिले पद हे उपमान असते.

उदाहरणार्थ - मातृमुखी, रेशीमधागा, पितृमुखी, कमलनयन, साखरपेरणी, चंद्रमुखी इत्यादी

उपमान – पूर्वपद समासाविषयी अधिक माहिती

५. उपमान – उत्तरपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील दुसरे पद हे उपमान असते.

उदाहरणार्थ - पदकमल, नरसिंह, मुखचंद्र इत्यादी

उपमान – उत्तरपद समासाविषयी अधिक माहिती

६. रूपक – उभयपद कर्मधारय समास

या कर्मधारय समासामधील दोन्हीही पदे एकरूप असतात.

उदाहरणार्थ - बोधामृत, कन्यारत्न, विद्याधन, काव्यामृत, ज्ञानामृत, पुत्ररत्न इत्यादी

रूपक – उभयपद समासाविषयी अधिक माहिती

नञ तत्पुरूष समास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास

This educational article was first posted on and last updated on by