उपमान – उत्तरपद कर्मधारय समास
'उपमान – उत्तरपद कर्मधारय समास' म्हणजे काय?
ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील उत्तरपद म्हणजे दुसरे पद हे उपमान असते, त्या समासाला 'उपमान – उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
समासाची काही वैशिष्ट्ये
उपमान – उत्तरपद कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये
- उपमान – पूर्वपद कर्मधारय समास हा कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील उत्तरपद हे उपमान असते.
- या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
समासाची काही उदाहरणे
उपमान – उत्तरपद कर्मधारय समासाची काही उदाहरणे
उदाहरण क्र. १
- पदकमल = कमळासारखे पाय
'पदकमल' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'कमळासारखे पाय' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दुसरे पद (उत्तरपद) ‘पद’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये पाय हे कमळासारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
- नरसिंह = सिंहासारखा नर
'नरसिंह' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सिंहासारखा नर' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दुसरे पद (उत्तरपद) ‘नर’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये नर हा सिंहासारखा आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
- मुखचंद्र = चंद्रासारखे मुख
'मुखचंद्र' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'चंद्रासारखे मुख' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दुसरे पद (उत्तरपद) ‘मुख’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये मुख हे चंद्रासारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.