रूपक – उभयपद कर्मधारय समास
'रूपक – उभयपद कर्मधारय समास' म्हणजे काय?
ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे ही एकरूप असतात, त्या समासाला 'रूपक – उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
समासाची काही वैशिष्ट्ये
रूपक – उभयपद कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये
- रूपक – उभयपद कर्मधारय समास हा कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील दोन्ही पदे ही एकरूप असतात.
- या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
समासाची काही उदाहरणे
रूपक – उभयपद कर्मधारय समासाची काही उदाहरणे
उदाहरण क्र. १
- बोधामृत = बोधरूपी अमृत
'बोधामृत' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'बोधरूपी अमृत' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘बोध’ आणि ‘अमृत’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
- कन्यारत्न = कन्या हेच रत्न
'कन्यारत्न' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'कन्या हेच रत्न' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘कन्या’ आणि ‘रत्न’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
- विद्याधन = विद्या हेच धन
'विद्याधन' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'विद्या हेच धन' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘विद्या’ आणि ‘धन’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
- काव्यामृत = काव्यरूपी अमृत
'काव्यामृत' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'काव्यरूपी अमृत' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘काव्य’ आणि ‘अमृत’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
- ज्ञानामृत = ज्ञानरूपी अमृत
'ज्ञानामृत' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'ज्ञानरूपी अमृत' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘ज्ञान’ आणि ‘अमृत’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ६
- पुत्ररत्न = पुत्र हेच रत्न
'पुत्ररत्न' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पुत्र हेच रत्न' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘पुत्र’ आणि ‘रत्न’ ही एकरूप आहेत.
त्यामुळे त्याला 'रूपक - उभयपद कर्मधारय समास' असे म्हणतात.