उपमान – पूर्वपद कर्मधारय समास
'उपमान – पूर्वपद कर्मधारय समास' म्हणजे काय?
ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील पहिले पद हे उपमान असते, त्या समासाला 'उपमान – पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
समासाची काही वैशिष्ट्ये
उपमान – पूर्वपद कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये
- उपमान – पूर्वपद कर्मधारय समास हा कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील पूर्वपद हे उपमान असते.
- या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
समासाची काही उदाहरणे
उपमान – पूर्वपद कर्मधारय समासाची काही उदाहरणे
उदाहरण क्र. १
- मातृमुखी = मातेसारखे (आईसारखे) मुख असणारा / असणारी
'मातृमुखी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'मातेसारखे (आईसारखे) मुख असणारा / असणारी' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘मातृ’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये मुख हे मातेसारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
- रेशीमधागा = रेशमासारखा धागा
'रेशीमधागा' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'रेशमासारखा धागा' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘रेशी’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये धागा रेशमासारखा आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
- कमलनयन = कमळासारखे नयन (डोळे)
'कमलनयन' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'कमळासारखे नयन (डोळे)' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘कमल’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये डोळे कमळासारखे आहेत ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
साखरपेरणी = साखरेसारखी पेरणी
(गोड बोलून आपल्याला हवी तशी परिस्थिती किंवा वातावरण निर्मिती करणे)
'साखरपेरणी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'साखरेसारखी पेरणी' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘साखर’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये पेरणी (बोलणे) साखरेसारखी आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
- चंद्रमुखी = चंद्रासारखे मुख असणारा / असणारी
'चंद्रमुखी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'चंद्रासारखे मुख असणारा / असणारी' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘चंद्र’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये मुख हे चंद्रासारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ६
- सुर्यमुखी = सुर्यासारखे मुख असणारा / असणारी
'सुर्यमुखी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सुर्यासारखे मुख असणारा / असणारी' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘सुर्य’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये मुख हे सुर्यासारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ७
- पितृमुखी = पित्यासारखे मुख असणारा / असणारी
'पितृमुखी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पित्यासारखे मुख असणारा / असणारी' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्वपद) ‘पितृ’ हे उपमान आहे.
या सामासिक शब्दामध्ये मुख हे पित्यासारखे आहे ही उपमा दिलेली आहे.
त्यामुळे त्याला 'उपमान - पूर्वपद कर्मधारय समास' असे म्हणतात.