पसार होणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'पसार होणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'पसार होणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'पसार होणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • पळून जाणे
  • पलायन करणे
  • पळ काढणे

वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • मडक्यातल लोणी खाऊन श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी पसार झाले.

वरील वाक्यात असे दिसते की मडक्यातल लोणी खाऊन श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी तेथून पळून गेले.

हे दर्शविण्यासाठी 'पळून जाणे' याऐवजी 'पसार होणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • पोलिसांची गाडी येताना दिसताच चोर आडवाटेने पसार झाले.

वरील वाक्यात असे दिसते की पोलिसांची गाडी येताना दिसताच चोरांनी आडवाटेने पळ काढला.

हे दर्शविण्यासाठी 'पळ काढणे' याऐवजी 'पसार होणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'पसार होणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • यशोदेने पकडण्यासाठी धावताच श्रीकृष्ण तिथून पसार झाले.
  • अपघात झाल्यावर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला.
  • मालक येताच कामचुकार नोकर तिथून पसार झाला.
पर्वणी असणे पित्त खवळणे

This educational article was first posted on and last updated on by