उद्गारवाचक चिन्ह
( ! ) हे उद्गारवाचक चिन्ह आहे.
उद्गारवाचक चिन्ह हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात एखादी उत्कट भावना (आनंद, दुःख, आश्चर्य, भीती इत्यादी) व्यक्त करताना अशी भावना दर्शविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
बापरे! केवढा मोठा साप.
वरील वाक्यामध्ये साप बघितल्यानंतर येणारी भीतीची भावना व्यक्त करण्यासाठी बापरे हा शब्द वापरला आहे.
भीती हि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी बापरे या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
शाब्बास! असाच छान अभ्यास कर.
वरील वाक्यामध्ये शाबासकी देताना येणारी आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी शाब्बास हा शब्द वापरला आहे.
आनंद हि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी शाब्बास या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
अरेरे! तो दोन गुणांसाठी नापास झाला.
वरील वाक्यामध्ये केवळ दोन गुणांमुळे कोणीतरी नापास झाल्यामुळे मनात येणारी दुःखाची भावना व्यक्त करण्यासाठी अरेरे हा शब्द वापरला आहे.
दुःख हि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी अरेरे या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
वा! किती छान चित्र काढलंय.
वरील वाक्यामध्ये सुंदर चित्र बघून मनात येणारी आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी वा हा शब्द वापरला आहे.
आनंद हि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वा या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
छान! हीच खरी देशसेवा आहे.
वरील वाक्यामध्ये कोणीतरी चांगलं कार्य केल्यामुळे मनात येणारी आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी छान हा शब्द वापरला आहे.
आनंद हि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी छान या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले आहे.