धूम ठोकणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'धूम ठोकणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'धूम ठोकणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'धूम ठोकणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • पळून जाणे
  • पळ काढणे
  • वेगाने पळून जाणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • पोलीस आपल्या मागावर आहेत हे कळताच चोरांनी धूम ठोकली.

वरील वाक्यात असे दिसते की पोलीस आपल्या मागावर आहेत हे कळताच चोर तिथून वेगाने पळून गेले.

हे दर्शविण्यासाठी 'वेगाने पळून जाणे' याऐवजी 'धूम ठोकणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • शाळेची घंटा वाजल्यावर मुलांनी धूम ठोकली.

वरील वाक्यात असे दिसते की शाळेची घंटा वाजल्यावर मुले शाळेबाहेर वेगाने पळून गेले.

हे दर्शविण्यासाठी 'वेगाने पळून जाणे' याऐवजी 'धूम ठोकणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'धूम ठोकणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • बंद घरामध्ये दरोडा टाकून चोरांनी तेथून लगेच धूम ठोकली.
  • शाळेतल्या स्नेहसंमेलनात चित्रपट कलाकार आले आहेत, हे समजताच मुलांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच धूम ठोकली.
धीर न सोडणे नाक मुरडणे

This educational article was first posted on and last updated on by