वाक्याचे प्रकार (स्वरूपावरून)
मराठी व्याकरणातील स्वरूपावरून पडणारे वाक्याचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. केवल वाक्य
ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, त्यास केवल वाक्य असे म्हणतात.
२. संयुक्त वाक्य
संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात.
३. मिश्र वाक्य
मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात.