मिश्र वाक्य
मराठी व्याकरणात जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.
मिश्र वाक्याची काही वैशिष्ट्ये
- मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असते.
- मिश्र वाक्यामध्ये एक किंवा अधिक गौणवाक्ये असतात.
- मिश्र वाक्यामधील जे वाक्य स्वतंत्र असते, त्या वाक्याला मुख्यवाक्य किंवा प्रधान वाक्य असते म्हणतात.
- प्रधान वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात.
- प्रधान वाक्य आणि गौणवाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि त्यापासून मिश्र वाक्य तयार होते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
तुषार म्हणाला होता की आज पाऊस येणार.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – तुषार म्हणाला होता
- गौणवाक्य – आज पाऊस येणार
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
सरिता आज उशिरा आली कारण तिची नेहमीची बस चुकली.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – सरिता आज उशिरा आली
- गौणवाक्य – तिची नेहमीची बस चुकली
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी कारण या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
किरण नेहमी म्हणतो की मी मोठा होऊन डॉक्टर होणार.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – किरण नेहमी म्हणतो
- गौणवाक्य – मी मोठा होऊन डॉक्टर होणार
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ४
शरीरस्वास्थ्य उत्तम रहावे म्हणून आम्ही व्यायाम करतो.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – शरीरस्वास्थ्य उत्तम रहावे
- गौणवाक्य – आम्ही व्यायाम करतो
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ५
स्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर तिला नवीन मोबाईल मिळेल.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – स्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली
- गौणवाक्य – तिला नवीन मोबाईल मिळेल
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी तर या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ६
आई नेहमी म्हणते की पैसे सांभाळून वापरावे.
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.
- प्रधान वाक्य – आई नेहमी म्हणते
- गौणवाक्य – पैसे सांभाळून वापरावे
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.