केवल वाक्य

स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार

मराठी व्याकरणात ज्या वाक्यामध्ये 'एकच उद्देश्य' आणि 'एकच विधेय' असते, त्या वाक्याला 'केवल वाक्य' असे म्हणतात.

'केवल वाक्य' म्हणजे काय?

केवल वाक्य

मराठी व्याकरणात ज्या वाक्यामध्ये 'एकच उद्देश्य' आणि 'एकच विधेय' असते, त्या वाक्याला 'केवल वाक्य' असे म्हणतात.

'उद्देश्य' म्हणजे कर्ता आणि 'विधेय' म्हणजे क्रियापद होय.

काही उदाहरणे

केवल वाक्याची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
प्रत्येकाने कायदा पाळावा.
  • वाक्यातील उद्देश्य - प्रत्येकाने
  • वाक्यातील विधेय - पाळावा

वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.

या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.

त्यामुळे हे वाक्य 'केवल वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. २
बाजीप्रभू देशपांडे लढता-लढता अमर झाले.
  • वाक्यातील उद्देश्य - बाजीप्रभू देशपांडे
  • वाक्यातील विधेय - झाले

वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.

या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.

त्यामुळे हे वाक्य 'केवल वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ३
गोरक्ष आंबा खातो.
  • वाक्यातील उद्देश्य - गोरक्ष
  • वाक्यातील विधेय - खातो

वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.

या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.

त्यामुळे हे वाक्य 'केवल वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ४
अनिताने पंखा पुसला.
  • वाक्यातील उद्देश्य - अनिताने
  • वाक्यातील विधेय - पुसला

वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.

या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.

त्यामुळे हे वाक्य 'केवल वाक्य' आहे, असे समजावे.

काही वैशिष्ट्ये

केवल वाक्याची काही वैशिष्ट्ये

  • केवल वाक्यामधून कर्त्याने केलेली फक्त एकच मुख्य क्रिया व्यक्त होते.
  • केवल वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते.
  • केवल वाक्यामध्ये फक्त एकच विधान केलेले असते.
वाक्याचे प्रकार - स्वरूपावरून संयुक्त वाक्य

This educational article was first posted on and last updated on by