वर्ण म्हणजे काय?


वर्णांचे विविध प्रकारवर्ण म्हणजे काय?

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना मराठी व्याकरणामध्ये वर्ण असे म्हणतात.

मराठी भाषेतील वर्णांची वैशिष्ट्ये

 • वर्ण हे केवळ ध्वनी असतात, त्यामुळे त्यांना ध्वनीरूपे असेही म्हणतात.
 • बोलताना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण ते वर्णांच्या स्वरूपात लिहून ठेवतो.
 • वर्ण हा मराठी भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे. इतर मूलभूत घटक पुढीलप्रमाणे आहेत –

मराठी भाषेतील वर्ण

मराठी वर्णमालेत पुढीलप्रमाणे वर्ण आहेत –

 • मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेतील मूळ १२ स्वर
  • अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
 • मराठी वर्णमालेत नव्याने सामील करून घेतलेले २ स्वर
  • ऍ, ऑ
 • मराठी भाषेतील ३४ व्यंजने
  • क्, ख्, ग्, घ्, ङ्
  • च्, छ्, ज्, झ्, ञ्
  • ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
  • त्, थ्, द्, ध्, न्
  • प्, फ्, ब्, भ्, म्
  • य्, र्, ल्, व्, श्
  • ष्, स्, ह्, ळ्

क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत, त्यामुळे त्यांचा समावेश वर्णमालेत केला जात नाही.

 • क्ष = क् + ष् + अ
 • ज्ञ = द् + न् + अ

मराठी भाषेतील वर्णांचे प्रकार

मराठी भाषेतील वर्णांचे उच्चारस्थानावरून पुढीलप्रमाणे सहा (६) प्रकार आहेत –

१. कंठ्य वर्ण

पडजीभ आणि जिभेची मागील बाजू या दोन्हीच्या संयोगातून अथवा सहकार्याने निर्माण होणारे वर्ण म्हणजे कंठ्य वर्ण होय.

उदाहरणार्थक्, ख्, ग्, घ्, ङ् इत्यादी.

२. तालव्य वर्ण

जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थच्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श् इत्यादी.

३. दंततालव्य वर्ण

कठोर तालूच्या दातांकडील सरबरीत आणि फुगीर असा जो भाग आहे, त्यास ‘वत्सं’ असे म्हणतात. या भागात उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना दंततालव्य वर्ण असे म्हणतात.

मराठी वर्णमालेतील वर्णांची नावे आणि त्यांचे उच्चार सामान्यतः एकच असतात. पण त्याला अपवाद ‘च’ या वर्गातील वर्णांचा आहे.

च्, छ्, ज्, झ् या वर्णांचा उच्चार तालव्य आणि दंततालव्य असा दुहेरी होतो.

४. मूर्धन्य वर्ण

जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ष्, ळ् इत्यादी.

५. दन्त्य वर्ण

जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर जे वर्ण निर्माण होतात त्यांना दन्त्य वर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थत्, थ्, द्, ध्, न्, ल्, स् इत्यादी.

६. ओष्ठ्य वर्ण

दोन्ही ओठांमधून निर्माण होणाऱ्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थप्, फ्, ब्, भ्, म् इत्यादी.

This article has been first posted on and last updated on by