'अव्यय' म्हणजे काय?
'अव्यय' म्हणजे काय?
वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही, त्यांना 'अव्यय' असे म्हणतात.
अव्ययाची काही उदाहरणे
अव्ययाची काही उदाहरणे
| पुढे | मागे | आणि | कडे |
| समोर | शाब्बास | किंवा | नेहमी |
क्रियाविशेषण अव्यय
अव्ययाचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये अव्ययांचे पुढीलप्रमाणे एकूण 'चार' मुख्य प्रकार आहेत.
१. क्रियाविशेषण अव्यय
जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला 'क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदाहरणार्थ - वारंवार, खूप, दररोज, काल, सतत, सर्वत्र, खाली, जलद, सावकाश, एकदा, दोनदा, मोजके, काहीसा, का, ना, न इत्यादी.
क्रियाविशेषणाचे अव्ययाचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत
- कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
- स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
- रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
- संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
- प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
- निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय
२. शब्दयोगी अव्यय
नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी त्याला जोडून वापरला जाणारा शब्द म्हणजे 'शब्दयोगी अव्यय' होय.
उदाहरणार्थ - साठी, मागे, समोर, खाली, मागे इत्यादी.
उभयान्वयी अव्यय
३. उभयान्वयी अव्यय
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो, त्याला 'उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.
उदाहरणार्थ - आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा इत्यादी.
उभयान्वयी अव्ययाचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत
- प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
- गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
४. केवलप्रयोगी अव्यय
एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला 'केवलप्रयोगी अव्यय' असे म्हणतात.
उदाहरणार्थ - वा, आहा, अरेरे, अगाई, अबब, बापरे, छान, अच्छा, छे, अरे, गप इत्यादी.