समानार्थी शब्द

समान अर्थाचा शब्द

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे 'समानार्थी शब्द' होय.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

समानार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे 'समानार्थी शब्द' होय.

समानार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिला जातो, त्याच्या अर्थाचा पर्यायी शब्द सांगणे अथवा लिहिणे.

वैशिष्ट्ये

समानार्थी शब्दाची काही वैशिष्ट्ये

  • समानार्थी याचा नेमका अर्थ 'समान अर्थ' असणारा असा होतो.
  • दिलेल्या शब्दाच्या अर्थाचे समानार्थी शब्द एक किंवा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात.
  • समानार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दानंतर अपसरण चिन्ह ( - ) वापरले जाते.
काही उदाहरणे

उदाहरणार्थ,

आई - माता, जननी

'आई' हा मूळ शब्द आहे असे जर आपण म्हटले, तर 'माता' आणि 'जननी' हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

'माता' म्हणजेच आई, आणि 'जननी' म्हणजेच जन्म देणारी ती आई.

तृप्ती - समाधान, संतोष

'तृप्ती' हा मूळ शब्द आहे असे जर आपण म्हटले, तर 'समाधान' आणि 'संतोष' हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

कृष्ण - कान्हा, वासुदेव, मुरारी

'कृष्ण' हा मूळ शब्द आहे असे जर आपण म्हटले, तर 'कान्हा', 'वासुदेव' आणि 'मुरारी' हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

'कृष्ण' म्हणजेच 'कान्हा', तर 'वासुदेव' आणि 'मुरारी' हीसुद्धा कृष्णाचीच नावे आहेत.

समानार्थी शब्द - अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, ऋ

समानार्थी शब्दांची यादी 'अ' पासून 'ऋ' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

अखंड

अभंग, सलग, एकसंध, अख्खा, संपूर्ण

अग्नी

विस्तव, आग, ज्वाला, अग्निशिखा

अग्र

टोक, शेंडा, शिरोभाग, कळस

अग्रणी

मुख्य, नायक, अग्रेसर

अघोर

भीतिदायक, राक्षसी, आसुरी

अचरट

वाह्यात, व्रात्य, अयोग्य

अचाट

विलक्षण, अजब, भलतेच

अचानक

अनपेक्षित, अकस्मात, आकस्मिक, अकल्पित

अचूक

योग्य, रामबाण

अचेतन

निर्जीव, निष्प्राण, प्राणरहित

अर्जुन

पार्थ, धनंजय, जिष्णु

अजेय

अजिंक्य, अजित, अमोघ

अटकाव

अडथळा, प्रतिरोध, अडसर, मनाई, आडकाठी

अडचण

संकट

अडाणी

अशिक्षित, मूर्ख, मूढ, अज्ञानी

अतिरेक

बेसुमार, कळस

अतिथी

पाहुणा

अथवा

वा, किंवा, अगर

अद्भुत

अपूर्व, आश्चर्यकारक, दैवी, चमत्कारिक, विलक्षण, अजब

अधाशी

हावरा, लोभी, हपापलेला

अधांतरी

हवेत, निराधार, निरालंब

अर्धा

निम्मा, अद

अधिकार

आधिपत्य, स्वामित्व

अधःपतन

अधोगती

अनाथ

निराधार, पोरका

अनावर

अनियंत्रित, बेफाम, बेभान

अनुकूल

फायदेशीर, उपकारक, हितकारक

अनुकंपा

दया, कृपा

अनुक्रमणिका

सूची

अनुभूती

प्रत्यय, प्रचिती, साक्षात्कार

अनुरूप

यथायोग्य, यथोचित, शोभणारे

अनुशासन

कायदा, नियम

अपमान

अनादर, मानभंग, अवहेलना, उपहास, उपमर्द, पाणउतारा

अपत्य

मूल, संतान, संतती

अपहार

अफरातफर

अपंग

लुळा, विकल, पंगू, विकलांग, दिव्यांग

अप्रतिम

अद्वितीय, अतुल्य, अनुपम, उत्कृष्ट

अफवा

वदंता, आवई

अबोल

घुमा

अभ्यास

व्यासंग, सराव, परिपाठ

अभ्युदय

उत्कर्ष, भरभराट, उत्थान

अभद्र

अशुभ, अमंगल, वाईट, अरिष्ट

अभिजात

कुलीन, सभ्य, जातिवंत, अस्सल

अभिधान

नाव, उल्लेख, अर्थबोध

अभिनय

हावभाव, नक्कल, सोंग

अमानुष

अमानवी, हिंसक

अमंगल

अशुभ, अनिष्ट, खराब

अल्क

खार, क्षार

अल्लड

अप्रौढ

अवकळा

अवदशा, तेजोहीन, दुर्दशा

अवडंबर

भपका, डौल, देखावा, स्तोम, थाटमाट

अवनती

अपकर्ष, दुर्दशा

अवधी

वेळ, अवकाश, सवड

अवबोध

ज्ञान, जाणीव, जागृती

अव्याहत

अखंड, अविरत, निरंतर, अक्षय

अवाढव्य

अफाट, विस्तीर्ण

अविनाशी

शाश्वत

अशक्त

रोडका, दुर्बल, क्षीण, कमजोर, दुबळा, कमकुवत, शक्तीहीन, बलहीन

अशुद्ध

अपवित्र

अशुभ

अमंगल, अनिष्ट, अभद्र

असभ्य

लज्जास्पद

असमंजस

बुद्धिहीन, अविवेकी, अविचारी, मूर्ख

असूया

मत्सर, हेवा, द्वेष

अस्त

लोप, अंतर्धान

असंख्य

अगणित, अमर्याद

आई

माता, जननी, माय, माऊली, जन्मदात्री, अंबा, मातोश्री

आकर्षक

मोहक

आकार

ठेवण, आकृती, घडण, ढब, रूप

आकाश

आभाळ, गगन, अंबर, नभ

आकाशवाणी

नभोवाणी

आक्रमण

हल्ला, चढाई

आक्रोश

आकांत, विलाप, हंबरडा, आक्रंदन

आकांक्षा

इच्छा, मनिषा, कामना, हेतू, अभिलाषा

आखूड

तोकडे, अपुरे, लहान, त्रोटक, कमी, अरूंद, थिटा

आचरट

फाजील, व्रात्य, खोडकर

आचरण

वागणूक, वर्तणूक, वर्तन, आचार

आजार

व्याधी, रोग, दुखणे, अस्वास्थ्य

आजीव

आजन्म, तहहयात, जन्मभर, आयुष्यभर

आटोकाट

शिकस्तीचा

आठवण

स्मरण

आता

सध्या, यावेळी

आतुर

उत्सुक, अधीर, उतावळा, उत्कंठित

आत्महत्या

आत्मघाव, आत्मनाश आत्मार्पण, स्वहत्या

आदर

मान, प्रतिष्ठा, पूज्यभाव

आदितवार

रविवार

आदेश

आज्ञा, हुकूम, फर्मान

आध्यात्मिक

पारमार्थिक

आनंद

हर्ष, उल्हास, मोद, प्रमोद

आपुलकी

आत्मीयता, जिव्हाळा, आस्था, ममता, ममत्व

आबाळ

हेळसांड, हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, हलगर्जीपणा

आमिष

प्रलोभन, लालूच

आरसा

दर्पण

आरोप

ठपका, आळ

आरंभ

प्रारंभ, उगम, मूळ, आद्य, आदिम, प्रथम

आवड

रुची, गोडी, अभिरुची

आसन

बैठक

इजा

नुकसान

इनाम

बक्षीस

इशारा

सूचना

उचलबांगडी

हकालपट्टी

उत्साह

आवेश, दम, ताकद, जोर, बळ

उतावळेपणा

अधीरता, घायकुतेपणा

उद्धटपणा

उर्मटपणा

उधारी

कर्ज, ऋण

उनाड

भटक्या, खोडकर, अवलक्षी

उपजिविका

उदरनिर्वाह, योगक्षेम, चरितार्थ

उपद्रव

त्रास, छळ

उलटा

विरूद्ध, ऊंधा, ऊफराटा

उलटी

ओकारी, वांती, वमन

उषःकाल

पहाट

उसासा

सुस्कारा

ऊर्जा

शक्ती

ऊर्मी

तरंग, लहरी

एककल्ली

एकमार्गी, हटवादी, हेकेखोर

एकटा

एकाकी, एकला

एकाग्र

एकचित

एकात्मता

एकरूपता, तादाम्य

एकी

ऐक्य, एकोपा, एकता

ऐट

डौल, नखरा, गर्व, तोरा, घमेंड

ओटी

पदर, ओचा

ओढणी

अवगुंठन

ओढा

ओघ, लोंढा, झरा, पाट, नाला

ओसाड

निर्जन, उजाड, वैराण, पडिक

औदार्य

उदारपणा, दातृत्व, दानशीलता

औक्षण

ओवाळणे

अंगकाठी

बांधा, शरीरयष्टी

अंत

शेवट, मृत्यू

अंतर्धान

अदृश्य, लुप्त

अंथरूण

पथारी, बिछाना

अंदाज

कयास, तर्क, अदमास, अनुमान

अंधार

काळोख, तम, तिमिर, अंधकार

अंश

तत्वांश, कस

ऋणी

आभारी, कृतज्ञ, कर्जदार, देणेदार

ऋषी

साधू, योगी, संन्याशी, मुनी, तपस्वी

समानार्थी शब्द - क, ख, ग, घ

समानार्थी शब्दांची यादी 'क' पासून 'घ' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

कर्कश

कर्णकठोर

कड

बाजू, सीमा

कडक

टणक, कठोर, तापट, शिस्तप्रिय

कडा

तुकडा, कोर

कठीण

अवघड, बिकट

कठोर

निर्दयी, निष्ठूर

कणव

दया, करूणा

कर्ण

कान

कर्तृत्व

पराक्रम, कर्तृकी, कर्तबगारी

कथा

गोष्ट

कपटी

फसव्या, विश्वासघाती

कपडा

वस्त्र, पट, प्रावरण

कपाळ

भाल, ललाट

कमळ

पंकज, राजीव, अंबुज, सरोज, कुमुद, पद्म, उत्पल

कर्म

प्रारब्ध

कर्मफल

कर्मविपाक

कर

जकात, आयकर

करडा

काळपट

करणी

चेटूक, दुष्कृत्य

कलश

तांब्या, गडवा

कल्याण

हित, कुशल, क्षेम

कवच

आच्छादन, आवरण

कवण

कोण, काय, कोणता

कसब

प्रावीण्य, नैपुण्य, चातुर्य

कसरत

व्यायाम, मेहनत

कळस

शिखर, टोक

कागाळी

खोडी, कुरापत

काणा

चकणा, तिरळा

कानउघडणी

खरडपट्टी

काप

भाग, अंश, लचका, तुकडा

काम

कार्य, इच्छा, कर्तव्य

कारस्थान

कट, खल, मसलत

कासव

कूर्म, कच्छ, कच्छप

काळ

वेळ, अवधी

काळजी

सांभाळ, दक्षता, सावधगिरी, निगा, निगराणी, जोपासना

काळजी

चिंता, विवंचना

किताब

पदवी, बिरूद

किरकोळ

अशक्त, रोडका, बारीक, हडकुळा

किळसवाणे

ओंगळ, अमंगळ, घाणेरडे

कुटुंब

परिवार, वंश

कुरूप

विद्रुप, आकारहीन, बेढब

कुशल

सुखरूप, खुशाल, निपुण, प्रवीण, तरबेज, निष्णांत, पारंगत

केस

कुंतल, कच

कैवारी

साह्यकर्ता

कोकीळ

कोइल, कोगूळ

कोडगा

निर्लज्ज, निलाजरा

कोमल

नाजूक, मृदू, सुकुमार, कोवळे, मऊ

कोरडा

शुष्क, सुका

कोश

आच्छादन, खजिना

कांदा

कंद

किंचित

जरा, थोडा, तिळमात्र, अंमळसा

किंमत

मोल, भाव, दर, मूल्य

कोंडा

भुगा, भुसा, चुरा, तूस

कोंभ

तुरा, अंकुर, मोड

क्रम

रांग, ओळ, अनुक्रम

क्रीडा

लीला, विहार, खेळ, मनोरंजन

क्रूर

निर्दयी

खगोल

अंतरिक्ष, नक्षत्रखचित

खर्च

व्यय, विनियोग

खजिना

कोश, भांडार, कोशागार, संग्रह

खजील

लाजलेला, ओशाळा

खटपट

धडपड, खटाटोप, परिहास, प्रयत्न

खडतर

कठीण, त्रासदायक

खमंग

रूचकर, चविष्ट, चवदार, स्वादिष्ट

खरमरीत

प्रखर, खणखणीत, स्पष्ट

खाचा

कंगोरा

खाट

बाज

खाष्ट

द्वाड, दुष्ट, नतद्रष्ट

खिडकी

गवाक्ष, झरोका, वातायन, जाळी

खीर

पायस, लापशी

खुलासा

विवरण, स्पष्टीकरण, उलगडा

खुळा

मंद, जडबुद्धी, बावळट, अर्धवट, मूर्ख

खूण

चिन्ह, निशाणी, संकेत

खोडसाळ

टारगट, लुच्चा

खेद

वैषम्य, विषाद

खंडित

तुटक, दंतुर

खंत

खेद, खिन्नता

खंदा

साहसी, धाडसी, सामर्थ्यवान

खोंड

गोऱ्हा, पाडा

गच्छंती

समाप्ती, नाश

गर्जना

गजर

गट

मंडळी, टोळी, जमाव, समुदाय

गड

किल्ला, तट, दुर्ग

गडबड

धांदल, धामधूम, हुल्लड, गलबला, तारांबळ

गढूळ

अस्वच्छ

गणेश

गजानन, लंबोदर, गणपती, हेरंब, गणनायक, गणाधीश, गौरीपुत्र, विघ्नहर्ता, एकदंत, भालचंद्र, शिवसुत, विघ्नराज, गौरीनंदन, बुद्धीदेवता, विघ्नविनाशक, वक्रतुंड, गजमुख, कृपाकर, बुद्धीदाता, गजकर्ण, उमापुत्र, विकट, वरदविनायक, लंबकर्ण, विनायक, प्रमोद, बालगणपति, भूपति, मूषकवाहन, प्रथमेश्वर, नंदन

गर्द

दाट

गर्भगळीत

घाबरलेला, भयभीत

गरम

उष्ण, ऊन, तप्त

गरळ

विष, हालाहल

गरीब

दरिद्री, निर्धन, कंगाल, रंक, दीन, दुबळा, पामर

गरूड

खगेंद्र, वैनतेय, द्विजराज

गलिच्छ

मलिन, घाणेरडा, मळकट

गहन

खोल, अगाध, अथांग

गळू

बेंड, उटाणू, खांडूक, फोड

गाणे

गीत, पद्य

गाय

गो, गौ, धेनू, गोमाता, नंदिनी, कपिला, गोम

गार

थंड, शीत, शीतल

गाव

ग्राम, खेडे

गावकरी

ग्रामस्थ, ग्रामवासी

गावंढळ

खेडवळ, गावठी

गाहाळ

नष्ट

गाळण

त्रेधा

गुच्छ

जुडी, झुबका

गुद्दा

ठोसा, बुक्का, मुष्टीप्रहार

गुन्हा

अपराध

गुपित

गूढ, गौप्य, मर्म

गोष्ट

कथा, कहाणी

गंगा

जान्हवी, भागीरथी, विष्णुपदी

गंध

वास, दर्प

गंध

टिळा, तिलक

गोंडस

गोजिरवाणा, मोहक, मनोहर

गोरा

गौर, शुभ्र

गोषवारा

संक्षेप, सारांश, तात्पर्य

ग्लानी

मूर्च्छा, घेरी

ग्रह

मत, कल्पना, समजूत

गृहकलह

अंतःकलह, यादवी

घट

घडा, घागर

घट

तूट, नुकसान, तोटा, झीज, घसारा

घटस्फोट

काडीमोड, लग्नविच्छेद

घनघोर

भयंकर

घमेंडखोर

अहंकारी, चढेल, मग्रूर

घाव

तडाखा, उच्छेद

घास

ग्रास, कवळ

घोडा

अश्व, वारू, तुरंग

घोंगडी

घोंगडे, कांबळे

समानार्थी शब्द - च, छ, ज, झ

समानार्थी शब्दांची यादी 'च' पासून 'झ' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

चकचकीत

साफसूफ, लख्ख

चक्रम

तऱ्हेवाईक, विलक्षण

चर्चा

विचारविनिमय, ऊहापोह, वादविवाद, विचारविमर्श, विचारमंथन

चपखल

तंतोतंत, नीट, बरोबर, नेमका, साजेसा

चमक

उसण, एलकी

चमत्कार

करामत, नवल

चमत्कारिक

विलक्षण, अद्भुत, गजब, आश्चर्यकारक

चर

जंगम, चलनक्षम

चरण

पाय, पाद

चलाख

चाणाक्ष, धूर्त, चुणचुणीत, तरतरीत, चपळ

चष्मा

उपनेत्र

चहाडी

चुगली, लावालावी, कळ, कुटाळी

चालढकल

दिरंगाई, टंगळमंगळ, टाळाटाळ, हयगय

चावी

किल्ली

चिकट

चेंगट, कंजूष

चिकित्सा

रोगपरीक्षा, रोगनिदान, वितर्क, सुक्ष्मशोध

चित्तवेधक

आकर्षक, मनोवेधक, हृदयंगम

चित्र

प्रतिमा, छबी

चिरंजीव

चिरायू, दीर्घायुषी, अमर, शाश्वत, चिरंजीवी

चूर्ण

भुकटी, पावडर, चुरा, पूड, भुगा, बुकणी, फक्की

चेपणे

दाबणे

चेहरा

मुद्रा, रूप, चर्या, तोंडवळा

चैतन्य

चेतना, जीवनशक्ती

चोर

डाकू, चोरटा, भामटा, ठग, दरोडेखोर, लुच्चा, शर्विलक, उचल्या, खिसेकापू

चंगळ

रेलचेल, लयलूट, समृद्धी, चैन, मजा

चंद्र

सोम, शशी, चांदोबा, रजनीकांत, सुधाकर, विभाकर, शशांक, राकेश, निशानाथ, कलाधर, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, मयंक

चंद्रिका

ज्योत्स्ना, चांदणे, कौमुदी, चंद्रप्रकाश

चांगला

उत्कृष्ट, निवडक, उत्तम, भला, योग्य, छान, सुंदर, सुरेख, उत्कृष्ट, झक्क, मस्त, चोख

चिंतन

मनन, ध्यान, ध्यास

चिंता

काळजी, घोर, हुरहूर, विवंचना

चेंडू

कंदुक

चौकशी

विचारपूस

छत्रपती

चक्रवर्ती, सम्राट, राजाधिराज

छळ

जाच, छळणूक

छाप

ठसा, शिक्का, मुद्रा

छिद्र

बोळ, छेद, वेज, भोक

छीथू

हेटाळणी, फजिती

जग

विश्व, भुवन, दुनिया, पृथ्वी, जगत, भूलोक

जठर

पोट, उदर

जड

स्थूल

जन्म

जनन, प्रसव, उत्पत्ती

जल

पाणी, उदक, तोय, अंबू, नीर, जीवन, आप

जबर

जंगी

जमीन

भू, धरती, भूमी, भुई, धरणी, धरित्री, शेत

जागृत

सावध, सजग, जागा, जागरूक, सावधान, तत्पर, दक्ष, सचेत, खबरदार

जागा

स्थळ, स्थान, ठिकाण

जाज्वल्य

प्रखर, तेजस्वी, तेजःपुंज, लखलखीत, चमकदार

जाड्य

जडत्व, मंदपणा, स्थूलता

जात

वर्ण, वर्ग

जादू

गारूड, इंद्रजाल, मंत्रटोणा, गुप्तविद्या

जाहिर

प्रकट, प्रसिद्ध, सर्वश्रुत

जिराईत

कोरडवाहू, बंजर

जीर्ण

फाटलेला, फुटका

जीभ

जिव्हा, रसना, रसनेन्द्रीय

जीवन

आयुष्य, जीवित, जगणे

जुजबी

तात्पुरते, अस्थायी, हंगामी

जुना

जीर्ण, प्राचीन, पुरातन, पडीक, जून, पुराणा

जेवण

अन्न, भोजन, आहार

जोडपे

दंपती, युगल, युग्म, दुक्कल

जंगल

वन, रान, कानन

जंतू

कृमी, जंत, जीव, किडा, कीटक

ज्योतिष

भविष्य, जातक, कुंडली

ज्वाला

ज्योत, अग्नी, शिखा

झगमग

झकपक, चमक, चकाकी

झटपट

लवकर, पटपट, झपझप, जलद

झडती

तपासणी, शोध, धुंडाळा

झपाटा

आवेश, जोर, तडाखा

झरा

निर्झर

झळ

धग

झाड

वृक्ष, तरू, विटप, द्रुम, वनस्पती

झीज

क्षय, नाश, तूट

झुला

झोपाळा, झोका, हिंदोळा, पाळणा

झोपडी

कुटी, खोपट

झंजावात

वावटळ, तुफान, वादळ, चक्रवात, सोसाटा

झुंजार

लढवय्या, रणशूर, रणगाजी

झेंडा

निशाण, ध्वज, पताका

समानार्थी शब्द - ट, ठ, ड, ढ

समानार्थी शब्दांची यादी 'ट' पासून 'ढ' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

टवाळकी

थट्टा, उपहास, कुचेष्टा, नक्कल, टिंगल, छेड, मस्करी, खोड्या, उनाडक्या

टाहो

हंबरडा, आक्रोश

टाळा

कुलूप

टाळाटाळ

चालढकल, टंगळमंगळ, टोलवाटोलवी, चुकवाचुकव

टिका

आलोचना, भाष्य, टिप्पणी

टिप्पण

टीप, खुलासा, टिपण

टुमदार

रम्य, डौलदार, मोहक, सुरेख, छानदार

टोकरा

नाव, होडी

टोणगा

रेडा, हेला, खुळगा

टोपण

झाकण, आवरण

टोलेजंग

भव्य, अजस्त्र, विशाल, प्रचंड

टोळी

झुंड, जमाव, समूह, समुदाय

टंचाई

कमतरता

ठक

फसवा, भोंदू, धूर्त, दांभिक

ठसा

खूण, शिक्का

ठळक

स्पष्ट, जाड, ,मोठ्ठा, दृढ, लक्षणीय, निर्विवाद

ठाम

पक्का, स्थिर, दृढ, कायम, अविचल, निश्चित

ठेका

ताल, मक्ता

ठेव

संचय, निधी

ठेंगणा

बुटका, खुजा

डाकू

चोर, दरोडेखोर

डावपेच

कट, डाव

डोके

माथा, शीर्ष, शिर, मस्तक

डौलदार

सुबक, घाटदार, सुंदर

डंका

नौबत, नगारा

डंगर

म्हातारा, वृद्ध

डिंक

खळ

मठ्ठ, मूर्ख, अक्षरशत्रू, दगडोबा, अक्कलशून्य, निर्बुद्ध

ढिला

शिथिल, भोंगळ, सुस्त, खिळखिळा

ढीग

खच, भर, थर, रास, थप्पी

ढेकूण

मत्कुण

ढोर

गुरे, जनावरे

ढोंग

सोंग, पाखंड, बतावणी

समानार्थी शब्द - त, थ, द, ध, न

समानार्थी शब्दांची यादी 'त' पासून 'न' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

तक्ता

नकाशा, कोष्टक

तख्त

सिंहासन, आसन, गादी

तन

शरीर, देह, अंग, काया, तनू, वपु, कुडी

तप

ध्यान, मनन

तमा

पर्वा, फिकीर

तरबेज

निष्णात, निपुण, कुशल, पारंगत, वाकबगार

तलवार

खड्ग, कृपाण

तलाव

तळे, जलाशय, पुष्कर, सरोवर, कासार

तसदी

त्रास, वैताग, ताप

ताकीद

समाज, हुकूम, जरब

ताण

मिजास, रुबाब, तोरा, डौल

तात्पर्य

सारांश, मतितार्थ, भावार्थ, हेतू

तान्हाळू

तान्हेला, तृषित

ताप

ज्वर

तालीम

व्यायामशाळा

ताळमेळ

जुळणी, मेळ, जुळतेपणा

तिटकारा

वीट, चीड, कंटाळा

तीर

काठ, बाण, किनारा

तीव्र

उग्र, जालीम, जहाल, कडक, प्रखर, तीक्ष्ण

तुच्छ

हीन, नीच, अधम, क्षुद्र, तिरस्कार्थ

तुडुंब

ओतप्रोत, काठोकाठ, भरपूर, परिपूर्ण

तुसडा

तिरसट

तोटा

नुकसान, हानी, तूट, घट, खोट

तोतया

फसवा, लबाड

तोरा

दिमाख, नखरा, गर्व, डौल, अहंभाव, भपका

तंतू

धागा, दोरा

तोंड

मुख, आनन, मुद्रा, तुंड

त्वेष

स्फुरण, आवेग, आवेश, संताप

तृप्ती

समाधान, संतोष

त्रयस्थ

तिऱ्हाईत

त्रिधा

त्रेधा, घाई

थकवा

शीण, निरुत्साह, ग्लानी, शैथिल

थट्टा

चेष्टा, मस्करी, उपहास

थवा

समुदाय, जमाव, समूह,

थाट

शोभा, ऐट, डामडौल

थाळी

ताट, पात्र

थोडे

नाममात्र, तिळमात्र, किंचित, कणभर, लवमात्र

थोतांड

कुभांड, नाटक, पाखंड, लबाडी

थोरवी

मोठेपणा, महिमा, ज्येष्ठता, श्रेष्ठता

थांगपत्ता

सुगावा, माग, ठाव, छडा

दगड

धोंडा, शिला, अश्म, पाषाण, शिळा, खडक

ददात

उणीव, कमतरता, कमीपणा

दमट

ओला, आर्द्र, भिजलेला

दया

कृपा, करूणा, अनुकंपा, अनुग्रह

दरारा

धाक, भीती, जरब, दहशत

दरिद्री

कंगाल, निर्धन, दीन, भणंग, गरीब, निष्कांचन

दर्प

गर्व, अभिमान, अहंकार

दर्प

दुर्गंध

दल

पाकळी, सेना, विभाग

दलाल

अडत्या, मध्यस्थ

दवाखाना

रूग्णालय, इस्पितळ

दवंडी

गाजावाजा, डांगोरा

दहशत

भीती, धास्ती, धाक, भय, धडकी

दाखला

उदाहरण, दृष्टांत, नमुना

दागिना

अलंकार, रत्न, शोभा, आभूषण

दाट

गडद, भडक

दात

दंत, रदन, दशन

दानव

असुर, दैत्य, राक्षस

दाम

पैसा, मूल्य, अर्थ

दाम्पत्य

जोडपे, दंपती

दार

दरवाजा, कवाड, ताट

दारू

मद्य, मदिरा, सुरा

दास

गुलाम, सेवक, किंकर

दास्य

गुलामगिरी, पराधीनता, परवशता

दिमाख

डामडौल, नटवेपणा

दिलगिरी

दुःख, खिन्नता, खेद

दिवस

दिन, वासर, वार, अन्ह, अह

दिवा

दीपक, दीप

दुजाभाव

आपपरभाव, द्वैतभाव

दुराचारी

दुर्वर्तनी, अनाचारी

दुर्जन

नीच, दुष्ट, असाधू

दुर्दैवी

अभावी, दैवहीन, कमनशिबी, दुर्भाग्यशाली

दुर्धर

कठीण, असाध्य, अवघड

दुबळा

अशक्त, कमजोर, सामर्थ्यहीन, दुर्बल

दुष्ट

नीच, अधर्मी

दुःख

शोक, पीडा, क्लेश, त्रास, यातना, खेद

दूध

दुग्ध, क्षीर, गोरस, पय

दूधखुळा

भोळसर, अजाण, मेषपात्र

देऊळ

मंदिर, देवालय, राऊळ

देणेकरी

कर्जदार, ऋणको, ऋणाईत

देव

परमेश्वर, ईश्वर, ईश, सुर, निर्मिक, निर्जर, अमर

देवाज्ञा

देहावसान, दीर्घनिद्रा, मरण, मृत्यू, चिरमरण, चिरनिद्रा

दैन्य

हलाखी, गरिबी, कंगालपणा

दैव

प्रारब्ध, नशीब

दोर

दावण, रस्सी, सुंभ

दंगल

दंगा, धुमाकूळ, धांगडधिंगा, धामधूम, हुल्लड

दंडुकेशाही

दडपशाही, दांडगाई, अरेरावी

दंतकथा

आख्यायिका, जनश्रुती

द्रव्य

धन, संपत्ती, संपदा, दौलत

दृष्टादृष्ट

दृष्टीभेट, नजरानजर

धक्का

हिसका, प्रहार, आघात

धडाडी

चिकाटी, निग्रह

धटिंगण

उर्मट, आडदांड, दांडगा, टग्या

धन

द्रव्य, पैसा, संपदा, संपत्ती, दौलत, अर्थ

धन्य

कृतार्थ, भाग्यवान, कृतकृत्य

धनिक

श्रीमंत, सावकार

धनी

मालक, स्वामी, यजमान

धनुष्य

धनू, चाप, कोदंड, कार्मुक, कमठा

धवल

पांढरे, शुभ्र, श्वेत, ढवळा

ध्वज

निशाण, पताका, झेंडा

ध्वनी

आवाज

धागा

सूत, दोरा

धाडशी

शूर, धीट, साहसी, निर्भय, धैर्यशील

धाडस

धैर्य, साहस, हिंमत, निर्भयता, धीटपणा

धिक्कार

निंदा, निषेध

धूर्त

लुच्चा, लबाड, भांडखोर, कावेबाज

धूळ

धुरळा, रजःकण, माती

धंदा

व्यापार, व्यवसाय, उद्योग, उदीम

धुंदी

झापड

नकली

कृत्रिम, खोटा, बनावट

नकाशा

चित्रण, रेषाकृती, आराखडा

नजराणा

देणगी, अहेर, उपायन

नड

अडचण, तंगी

नदी

सरिता, तटिनी, नद्य, तरंगिणी, निर्झरिणी, जलवाहिनी, तारिणी

नमन

प्रणिपात, दंडवत, प्रणाम, वंदन, नमस्कार, कुर्निसात, अभिवादन

नमस्कार

अभिवादन, नमन, वंदन

नर

पुरूष, मनुष्य, मर्द

नवरा

पती, कांत, भर्ता, धव, भ्रतार, वल्लभ, धनी, मालक

नवल

आश्चर्य

नवीन

नूतन, आधुनिक, नवे, अभिनव

नश्वर

क्षणभंगुर, क्षयी, अशाश्वत, नाशवंत

नक्षत्र

तारा, तारका

नाक

नासिका, घ्राणेंद्रिय

नाग

सर्प, साप, भुजंग, तक्षक, उरग, फणी, उन्नग, पन्नग, अही, व्याल, विषधर

नाचक्की

बेअब्रू, नामुष्की, अपकीर्ती, बदनामी

नाजूक

कोमल, सुकुमार, मृदू, अलवार

नाडणूक

छळ, लुबाडणूक, ठकवणूक

नाते

आत्मीय, आप्तपणा, रक्तसंबंधी

नाद

आवाज, छंद, ध्वनी, निनाद

नापास

अनुत्तीर्ण, अयशस्वी

नामी

उत्कृष्ट, उमदा, सरस, वाखाणण्याजोगी

निकष

कसोटी, परिक्षा

निजधाम

स्वर्ग

निर्धार

निश्चय, निग्रह, दृढसंकल्प

निपुण

कुशल, तरबेज, पारंगत

निरीक्षण

अवलोकन, पाहणी

निवाडा

न्याय, निर्णय

निश्चित

खात्रीपूर्वक, निःसंदेह

नीरव

निःशब्द, शांत

नैतिक

विहित, नीतिनुसार

समानार्थी शब्द - प, फ, ब, भ, म

समानार्थी शब्दांची यादी 'प' पासून 'म' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

पगार

वेतन

पटकी

महामारी

पण

प्रतिज्ञा, नेम, शपथ, वचन

पण

परंतु, किंतु, शिवाय

पत्नी

अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, आर्या, वामांगी, गेहिनी, सहचरी, गृहस्वामिनी

पद्धत

रीत, चाल, प्रघात, प्रथा, तऱ्हा, परंपरा, रिवाज

पय

पाणी, दूध

परमार्थ

ब्रह्ममोक्ष

पराजय

पराभव, हार

पराणी

हत्यारी, आर, टोचणी

परिक्षा

चाचणी, पारख, कसोटी, दिव्य, कस, तपासणी

पर्वत

गिरी, डोंगर, अचल, नग, शैल, अद्री, महीधर, भूधर, धराधर

पवित्र

पावन, निर्मळ, मंगळ, शुची, शुध्द, सात्विक

पक्ष

बाजू, पंधरवडा

पक्षी

खग, विहंग, द्विज, अंडज, पाखरू

पाऊस

पर्जन्य, वर्षा

पाठ

नियम, धडा

पाठिंबा

पुष्टीकरण, दुजोरा

पाणी

जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलिल, वारी, नीर, तोय, आप

पान

पर्ण, पत्र, दल, पल्लव, पत्री

पाप

दोष, पातक, कुकर्म, दुरित, दुष्कृत्य

पाय

पद, चरण, पाद, पाऊले

पार

कट्टा, पलीकडे

पारिपत्य

पराभव, शिक्षा, दंड

पार्वती

उमा, दुर्गा, गौरी, कन्याकुमारी, काली, अपर्णा, सती, भवानी

पितर

पूर्वज, माता-पिता

पिता

जनक, बाप, वडील, तीर्थरूप

पीत

पिवळा

पुण्य

सुकृत, सत्कर्म, श्रेयस

पुरूष

नर, मर्द

पुष्प

कुसुम, सुमन, फूल

पूजा

अर्चना, अर्चा, सेवा, उपासना, अर्चन

पूर्व

आधीचा, पूर्वीचा, पूर्व दिशा

पैसा

दाम, द्रव्य, धन

पोरका

निराधार, अनाथ

पंडित

पुरोहित, गुरूजी, आचार्य, विद्वान, शास्त्री

पंथ

मार्ग, रस्ता, वाट, पथ

पांगळा

पंगू, लंगडा, लुळा, विकलांग, अपंग, दिव्यांग

पांढरा

सफेद, धवल, ढवळा

प्रकार

तऱ्हा, जात, दर्जा

प्रकाश

उजेड, तेज, दीप्ती, कांती, आलोक

प्रगल्भ

गंभीर, शहाणा, प्रौढ

प्रचिती

अनुभव, पडताळा, प्रत्यय

प्रचंड

अवाढव्य, विशाल, अजस्त्र

प्रतिष्ठा

लौकिक, मानमरातब

प्रबंध

व्यवस्था, योजना, तजवीज, संयोजन, दीर्घलेखन

प्रेम

प्रीती, लोभ, स्नेह, अनुराग, अनुरुक्ती

पृथ्वी

धरणी, अवनी, भूमी, धरती, मही, धरित्री, वसुंधरा, क्षया, धरा, भूरसा, वसुधा

फक्कड

सुंदर, छान, सुरेख, मनोहर

फज्जित

लज्जित, ओशाळलेला, वरमलेला

फट

भेग, चीर, खाच

फडतूस

टाकाऊ, क्षुद्र, फालतू

फत्ते

यश, जय, सरशी

फरक

भेद, तफावत, अंतर

फसवणूक

ठकबाजी, प्रतारणा, लबाडी, लुच्चेगिरी

फिदा

खुश, आसक्त

फिर्याद

तक्रार

फुलोरा

बहर, मोहोर

फुशारकी

बढाई, शेखी, डामडौल

फूट

भेद, बेबनाव, दुही, दुफळी, बेकी, फाटाफूट, विघटन

फोड

सूज, गाठ, तुकडा (फळाचा)

फोल

टरफल, कोंडा, भुसा, निरर्थक, व्यर्थ, रिकामे

फौज

सैन्य, सेना, दल, लष्कर

बखर

बातमी, हकिकत, इतिहास, वार्ता, संदेश

बजरंग

पवनपुत्र, हनुमान, मारूती, अंजनीसुत, वायुपुत्र, महाबला, अमितविक्रम

बडगा

सोटा, टोमणा, सोमटा

बदफैली

कुकर्मी, व्याभिचारी, दुःशील

बदल

पालट, फेर, फरक

बरकत

भाग्य, सुदैव, भरभराट

बरखास्त

समाप्त, विसर्जित, संपणे

बरोबर

सारखा, सम, योग्य

बहाणा

सोंग, ढोंग

बहीण

भगिनी, सहोदरा, अग्रजा (मोठी बहीण), अनुजा (धाकटी बहीण)

बळ

ताकद, शक्ती, जोर, सामर्थ्य, कुवत

बाकी

उरलेले, शेष, उर्वरीत

बाग

बगीचा, उद्यान, उपवन, वाटिका, पुष्पवन

बाण

शर, तीर, सायक

बाप

पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, तात

बारीक

बारका, सूक्ष्म, लहान

बाहू

हात, हस्त, कर, भूज, पाणि

बुद्धी

मती, अक्कल, मेधा, प्रज्ञा

बैल

खोंड, पोळ, वृषभ

बोकड

बकरा, अज

बोभाटा

गवगवा, हाकाटी

बंदोबस्त

व्यवस्था, तजवीज

ब्रम्हदेव

ब्रम्हा, चतुरानन, विधी, विरंची, कमलासन

ब्राम्हण

द्विज, वाडव, भूमिदेव, विप्र, अग्रजन्मा

भय

धाक, धास्ती, दहशत, जरब, वचक, दरारा

भयंकर

वाईट, अमंगल

भरपूर

पुष्कळ, रग्गड, चिकार, प्रचूर, विपुल, उदंड, मुबलक

भरभराट

उत्कर्ष, प्रगती, समृद्धी

भला

चांगला, सज्जन

भाऊ

भ्राता, बंधू, सहोदर, अग्रज (मोठा भाऊ), अनुज (धाकटा भाऊ)

भाकीत

ठोकताळा, आडाखा, स्थूलमान

भाबडा

साधा, निष्कपटी, निर्मत्सरी

भाव

भक्तिभाव, श्रद्धा, दर (वस्तूचा)

भुरळ

मोहिनी, भ्रम, मोह, गारूड, मंत्रमुग्धता

भूक

क्षुधा, बुभूक्षा

भूषण

अलंकार, लेणे, दागिना

भीड

पर्वा

भेट

गाठ, आलिंगन, नजराणा, मुलाखत

भोवळ

घेरी, चक्कर, मूर्च्छा

भंगुर

नश्वर, क्षणिक, अशाश्वत

भंजन

मोड, विध्वंस, निर्दालन

भांडखोर

बोलभांड

भांडण

वैर, तंटा, खटका, वाद, खडाजंगी, कलह, झगडा

भुंगा

भ्रमर, अलि, मिलिंद, मधुप, भृंग, मधुकर

मग्न

गुंग, तल्लीन, दंग

मगर

सुसर, नक्र

मग्रूर

गर्विष्ठ, चढेल, उर्मट, उद्दाम, उद्धट

मजल

पल्ला, टप्पा

मज्जाव

निर्बंध, मनाई, अटकाव, आडकाठी

मजूर

गडी, कष्टकरी, कामकरी, श्रमिक

मदत

साहाय्य

मन

चित्त, मानस, अंतःकरण, अंतरंग

मनोरंजन

करमणूक, अनुरंजन

मयंक

सूर्य व चंद्र

मरणोन्मुख

आसन्नमरण, मुमूर्षू

मशाल

दिवटी, हिलाल

महान

थोर, मोठा, प्रचंड, भव्य, विशाल, श्रेष्ठ, विराट, गुरू, महा

महाराणी

महाराज्ञी

महापुरूष

महानुभाव, महामना, महात्मन

महिना

मास, माह

म्यान

कुक्षि

माकड

मर्कट, वानर, कपि, शाखामृग

माग

तपास, थांग, छडा

माणूस

मनुष्य, मानुष, मनुज

मात्रा

उपाय, इलाज

मान्य

मंजूर, संमत

मान्यता

संमती, सहमती, स्वीकृती

माया

प्रेम, वात्सल्य, दया, कृपा

मासा

मत्स्य, मीन, मच्छ

माळ

सर

मित्र

सखा, सोबती, सवंगडी, दोस्त, सुहृद, सांगाती, स्नेही

मिश्रण

मिसळ

मिळकत

आय, प्राप्ती

मीठ

सैंधव, लवण

मीलन

मेळ, संगम, संयोग, एकत्रीकरण

मुनी

ऋषी, यती, तपस्वी, योगी, महर्षी

मुलगा

सुत, पुत्र, चिरंजीव, नंदन, तनय, आत्मज, नंदन, तनुज

मुलगी

कन्या, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, नंदिनी, दुहिता

मूर्च्छा

घेरी, भोवळ, फीट

मेरू

आधार

मैत्रीण

सखी, सोबतीण

मैना

सारिका, साळुंखी

मोर

मयूर, नीलकंठ, केकी, शिखी

मोलकरीण

दासी, बटीक

मोसम

ऋतू, हंगाम

मोक्ष

मुक्ती

मंगल

पवित्र, शुभ

मंजुरी

मान्यता, परवानगी, संमती, अनुमती

मंजूर

मान्य, कबूल

मंडई

बाजार, बाजारहाट

मुंज

उपनयन, मौजीबंधन

समानार्थी शब्द - य, र, ल, व, श

समानार्थी शब्दांची यादी 'य' पासून 'श' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

यत्न

खटपट, परिश्रम

यद्यपि

जरी

यमराज

यम, मृत्यूदेवता, कृतांत, काल, श्राद्धदेव, पितृपती

यातना

कष्ट, हाल, अपेष्टा

यातायात

त्रास, श्रम, कष्ट

युक्ती

चातुर्य, कल्पना, शक्कल

युगूल

जोडी, जोडपे

युती

संयोग, मिलाफ

येरझारा

चक्कर, फेरी, खेप

योग

संधी

योगक्षेम

उदरपोषण, चरितार्थ, निर्वाह, उपजीविका

योग्य

उचित, ठीक, यथार्थ, बरोबर, खरे, वास्तविक

योद्धा

वीर, शूर, विक्रांत, पराक्रमी, लढवय्या

यःकश्चित

सामान्य, क्षुद्र, गौण

रक्कम

रोकड, मालमत्ता, द्रव्य

रक्त

रुधिर, असूद, शोणित

रग

मस्ती, गुर्मी, ताठा, मग्रूरी, मुजोरी

रगड

विपुल, मुबलक, खूप, गडगंज, चिकार, भरपूर

रजक

धोबी, परीट

रणगाजी

पराक्रमी, शूर, रणझुंजार, लढवय्या

रथी

योद्धा (रथातून लढणारा)

रसहीन

कोरडा, सुका, द्रवहीन

रसज्ञ

रसिक, मर्मज्ञ

रस्ता

वाट, पथ, पंथ, मार्ग

रहस्य

मर्म, गूढ, खुबी

रक्षण

बचाव, संरक्षण

राकट

आडदांड, दणकट

राग

क्रोध, संताप, रोष, त्वेष

रागीट

कोपी, संतापी, कोपिष्ट, रागीष्ट, क्रोधिष्ट

राजा

नृप, नरेश, भूपाल, नृपती, राया, भूपती, भूप, पृथ्वीपती, प्रजापती, महिपती, अवनीपती

राणी

राज्ञी, राजपत्नी, सम्राज्ञी

रात्र

निशा, रजनी, यामिनी, शर्वरी, विभावरी, क्षपा, तमी

राबता

वर्दळ, ये-जा, येणे-जाणे

राक्षस

दानव, असुर, दैत्य

रात्रंदिवस

सतत, अहोरात्र, अष्टर्निशी

रिता

रिकामा, रिक्त, मोकळा

रुकार

होकार, संमती, मान्यता

रुणझुण

मंजूळ आवाज

रूढ

चालू, प्रचलित

रोग

व्याधी, विकार, पीडा, उपद्रव

रोमांच

काटा, शहारे

रंक

गरीब, दीन

रंभा

अप्सरा, देवांगना

लकडा

नेट

लकब

पद्धती, धाटणी, ढब, शैली

लगत

समीप, जवळ, निकट, सन्निध

लज्जत

गोडी, माधुरी

लढाई

युद्ध, समर, रण, संगर, संग्राम, द्वंद्व

लता

वेल, वल्लरी, लतिका, कुंज, वल्ली

लय

क्षय, नाश, निःपात

लवण

मीठ, क्षार, खार

लायक

पात्र, योग्य, व्यक्तिरेखा

लावण्यवती

रूपवती, देखणी, सुंदर, सरूप, रूपवान, सुरूप, सुस्वरूप

लेखणी

कलम

लोभ

हाव, हव्यास

वचन

ठराव, कबुली, करार

वध

हत्या, खून

वाडा

प्रासाद

वाढ

उत्कर्ष, भरभराट, प्रगती, उन्नती, वृद्धी

वाहवा

स्तुती, प्रशंसा, वाखाणणी

विद्यार्थी

छात्र, शिष्य

विरळ

पातळ, विरविरीत

वारा

वायू, पवन

विलंब

उशीर

विवेचन

ऊहापोह

विस्तव

निखारा

विसंगत

असंबद्ध

वेगळे

अलिप्त, निराळे, तटस्थ

व्यवस्था

तरतूद

व्यसन

चाळा, अयोग्यनाद

वृत्तांत

मजकूर, हकिकत, बातमी

वृद्धत्व

वार्धक्य, म्हातारपण, जर्जर, वयस्क

शत्रू

वैरी

शुद्ध

स्वच्छ, शुभ्र

शिक्षक

अध्यापक, गुरूजी, गुरू

शेत

मळा, आगर

शोध

संशोधन

समानार्थी शब्द - ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

समानार्थी शब्दांची यादी 'ष' पासून 'ज्ञ' पर्यंत

मूळ शब्द

समानार्थी शब्द

सकाळ

प्रभात

समारोप

सांगता, शेवट, इतिश्री

सीता

जानकी, मैथिली, भूमिकन्या, वैदेही

सुवत्ता

समृद्धी, भरभराट, संपन्नता

सुवास

सुगंध

सौभाग्यवती

सुवासिनी, सवाष्ण, सधवा, अविधवा, अहेव

स्थावर

अजंगम, अचल

स्थूल

लठ्ठ, बोजड, गडशीळ

स्वर्ग

इंद्रलोक, त्रिविष्टप

स्वाभाविक

नैसर्गिक, सहज, प्राकृतिक, मूळ

स्वामी

धनी, मालक, अधिपती

स्वैर

स्वच्छंदी, बेलगाम

सोने

सुवर्ण, कांचन, हेम

संकट

अरिष्ट

संपत्ती

श्रीमंती, ऐश्वर्य, संपदा

संबंध

अन्वय

हट्टी

हेकेखोर, हेकट

हलकट

बदफैली, चैनबाज

हात

कर

होडी

नौका, नाव, तर

हुंदका

उमाळा, गहिवर

क्षणिक

अशाश्वत, क्षणभंगुर

क्षय

ऱ्हास

लिंग विरूद्धार्थी शब्द

This educational article was first posted on and last updated on by