गुणवाचक विशेषण म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो, त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही गुणवाचक विशेषणे –
सुंदरकुरूपधाडसीभित्रालालभडकहिरवेगारउंचबुटका
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
गोरक्ष धाडसी मुलगा आहे.
या वाक्यामध्ये गोरक्ष या मुलाच्या स्वभावाविषयी (गुणाविषयी) अधिक माहिती देण्यासाठी धाडसी हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
बागेत गुलाबाची पांढरी फुलं आहेत.
या वाक्यामध्ये गुलाबाच्या फुलांच्या रंगाविषयी (गुणाविषयी) अधिक माहिती देण्यासाठी पांढरी हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
भिंतीवरील चित्र सुंदर आहे.
या वाक्यामध्ये चित्राचे वर्णन करण्यासाठी सुंदर हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ४
त्या डोंगराच्या पलीकडे हिरवेगार रान.
या वाक्यामध्ये रानाच्या गुणाविषयी अधिक माहिती देण्यासाठी हिरवेगार हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.