इतरेतर द्वंद्व समास

द्वंद्व समासाचे प्रकार

ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ यांपैकी एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

इतरेतर द्वंद्व समास

'इतरेतर द्वंद्व समास' म्हणजे काय?

ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ यांपैकी एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

इतरेतर द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये
  • इतरेतर द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
  • या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
  • या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना ‘आणि’, ‘व’ यांपैकी एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, असे लक्षात येते.
इतरेतर द्वंद्व समासाची काही उदाहरणे

इतरेतर द्वंद्व समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • मिसळपाव = मिसळ आणि पाव

'मिसळपाव' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'मिसळ आणि पाव' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'मिसळ' आणि 'पाव' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'आणि' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • मायबाप = माय व बाप

'मायबाप' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'माय व बाप' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'माय' आणि 'बाप' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'व' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • राधाकृष्ण = राधा आणि कृष्ण

'राधाकृष्ण' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'राधा आणि कृष्ण' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'राधा' आणि 'कृष्ण' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'आणि' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • चेंडूफळी = चेंडू व फळी

'चेंडूफळी' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'चेंडू व फळी' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील 'चेंडू' आणि 'फळी' ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, ही दोन्ही पदे 'व' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.

त्यामुळे त्याला 'इतरेतर द्वंद्व समास' असे म्हणतात.

इतरेतर द्वंद्व समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
आईबापआई व बाप
बहीणभाऊबहिण व भाऊ
मायलेकीमाय आणि लेकी
विटीदांडूविटी आणि दांडू
द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास

This educational article was first posted on and last updated on by