विरूद्धार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दाचा उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरूद्धार्थी शब्द होय.

विरूद्धार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिला जातो, त्याच्या उलट अर्थाचा शब्द सांगणे अथवा लिहिणे.

विरूद्धार्थी शब्दाची काही वैशिष्ट्ये

  • विरूद्ध याचा नेमका अर्थ उलट अर्थ असा होतो.
  • विरूद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे चिन्ह (X) वापरले जाते.
  • दिलेल्या शब्दाच्या अर्थाचे उलटअर्थी किंवा विरूद्धार्थी एक किंवा अनेक शब्द असू शकतात.

उदाहरणार्थ,

उपयोगी X निरूपयोगी

वर दिल्याप्रमाणे उपयोगी या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आहे निरूपयोगी.

‘उपयोगी’ म्हणजे जे कामाचे आहे ते, तर त्याच्या विरूद्ध अर्थाचा शब्द होतो ‘निरूपयोगी’ म्हणजेच कामाचे नसणारे.

मंजुळ X कर्कश

वर दिल्याप्रमाणे मंजुळ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आहे कर्कश.

‘मंजुळ’ म्हणजे कानाला आवडणारे किंवा कर्णमधुर, तर त्याच्या विरूद्ध अर्थाचा शब्द होतो ‘कर्कश’ म्हणजेच कानाला ज्याचा त्रास होतो ते.

चविष्ट X बेचव

वर दिल्याप्रमाणे चविष्ट या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आहे बेचव.

‘चविष्ट’ म्हणजे रूचकर (चांगले जेवण), तर त्याच्या विरूद्ध अर्थाचा शब्द होतो ‘बेचव’ म्हणजेच चव नसलेले होय.

विरूद्धार्थी शब्दांची यादी

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक विरूद्धार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द X विरूद्धार्थी शब्द
अटक X सुटका
अर्धवट X पूर्ण / संपूर्ण
अनुभवी X अननुभवी
अल्लड X पोक्त
अवजड X हलके
अपेक्षित X अनपेक्षित
अभिमान X दुराभिमान
अमूल्य X कवडीमोल
अल्प X बहु
अल्पवयीन X प्रौढ
अल्पसंख्य X बहुसंख्य
अल्पायुषी X दीर्घायुषी
अस्त X उदय
अळणी X खारट
आकलनीय X अनाकलनीय
आकुंचन X प्रसरण
आगमन X गमन
आगेकूच X माघार
आघाडी X पिछाडी
आठवण X विस्मरण
आडवे X उभे
आत X बाहेर
आदर X अनादर
आधी X नंतर
आयात X निर्यात
आवक X जावक
आवश्यक X अनावश्यक
आशा X निराशा
आशीर्वाद X शाप
आस्तिक X नास्तिक
आस्था X अनास्था
आज्ञा X अवज्ञा
अंत X प्रारंभ
इकडे X तिकडे
इच्छा X अनिच्छा
इथली X तिथली
इलाज X नाईलाज
इमानदार X बेईमान
इष्ट X अनिष्ट
उगवणे X मावळणे
उष्ण X थंड / शीतल
उचित X अनुचित
उजेड X काळोख / अंधार
उत्तीर्ण X अनुत्तीर्ण
उत्साह X कंटाळा / निरुत्साह
उदय X अस्त
उद्घाटन X समारोप
उद्योगी X निरूद्योगी
उद्धट X शालीन
उपकार X अपकार
उपद्रवी X निरूपद्रवी
उलट X सुलट
उंच X ठेंगणा / बुटका
ऊन X पाऊस
एकमत X दुमत
एकवचन X अनेकवचन
ऐच्छिक X अनैच्छिक
आंधळा X डोळस
कच्चे X पक्के
कडू X गोड
कर्ता X नाकर्ता
कल्याण X अकल्याण
कबूल X नाकबूल
कळत X नकळत
कायदेशीर X बेकायदेशीर
काळा X पांढरा
किमान X कमाल
कृतज्ञ X कृतघ्न
कृपा X अवकृपा
खरे X खोटे
खरेदी X विक्री
खिन्न X प्रसन्न
खूष X नाखूष
खंडित X अखंडित
गद्य X पद्य
गरीब X श्रीमंत
गुण X दोष
गुरू X शिष्य
घट्ट X सैल
घन X द्रव
घाऊक X किरकोळ
घाणेरडा X स्वच्छ / निर्मळ
चढ X उतार
चढाई X माघार
चपळ X मंद
चविष्ट X बेचव
चारित्र्यवान X चारित्र्यहीन
चूक X अचूक
चांगले X वाईट
चिंताग्रस्त X चिंतामुक्त
छोटे X मोठे
जय X पराजय
जमा X खर्च
जन्म X मृत्यू
जर X तर
जड X हलके
जहाल X मवाळ
जागृत X निद्रिस्त
जाड X बारीक
जाणता X अजाणता
जाणे X येणे
जिवंत X मृत
टणक X मऊ
ठळक X पुसट
डावा X उजवा
डौलदार X बेढब
तरूण X म्हातारा
ताजी X शिळी
तारक X मारक
तिरपे X सरळ
तीव्र X सौम्य
तीक्ष्ण X बोथट
तेजस्वी X निस्तेज
तेजी X मंदी
तृप्त X अतृप्त
थोरला X धाकटा
दुरूस्त X नादुरूस्त
देव X दानव
देश X विदेश
देशभक्त X देशद्रोही
दोषी X निर्दोष
दृश्य X अदृश्य
धूसर X स्पष्ट
नम्र X उद्धट
नवे X जुने
निंदा X स्तुती / कौतुक
नीती X अनीती
नैसर्गिक X कृत्रिम
परवानगी X मनाई
पसंत X नापसंत
पात्र X अपात्र
पाप X पुण्य
पाया X कळस
पूजनीय X निंदनीय
पूर्ण X अपूर्ण
प्रगती X अधोगती
प्रधान X गौण
प्रश्न X उत्तर
प्राचीन X अर्वाचीन / आधुनिक
प्रामाणिक X अप्रामाणिक
प्रिय X अप्रिय
प्रेम X द्वेष
पौर्णिमा X अमावस्या
बंद X उघडे
भक्कम X कमकुवत
भरती X ओहोटी
भाऊ X बहिण
भित्रा X शूर
मराठी X अमराठी
मर्यादित X अमर्यादित
मागे X पुढे
मालक X नोकर / चाकर
मित्र X शत्रू
मित्रत्व X शत्रुत्व
मुलगा X मुलगी
यश X अपयश
रसिक X अरसिक
राजा X रंक
रात्र X दिवस
रिकामे X भरलेले
रूंद X अरूंद
लवकर X उशिरा
लक्ष X दुर्लक्ष
लायक X नालायक
लिखित X मौखिक
वक्ता X श्रोता
वधू X वर
विक्रेता X ग्राहक
विख्यात X कुख्यात
विचार X अविचार
विद्वान X अडाणी
विवेक X अविवेक
विशेष X गौण / सामान्य
विष X अमृत
शस्त्रधारी X निःशस्त्र
शाकाहारी X मांसाहारी
शिखर X पायथा
शिस्त X बेशिस्त
शिक्षक X शिक्षिका
शिक्षित X अशिक्षित / अडाणी
शुद्ध X अशुद्ध
सकर्मक X अकर्मक
सकारण X अकारण
सकारात्मक X अकारात्मक
सकारात्मकता X अकारात्मकता
सकाळ X संध्याकाळ
सक्रिय X निष्क्रीय
सचेतन X अचेतन
सजीव X निर्जीव
सदाचार X दुराचार
सद्गुण X दुर्गुण
सभ्य X असभ्य
सम X विषम
समज X गैरसमज
समाधानी X असमाधानी
समान X असमान
समानता X असमानता
सरकारी X खाजगी / वैयक्तिक
सरस X निरस
सशक्त X अशक्त
साम्य X फरक
सामान्य X असामान्य
सावध X बेसावध
सार्वजनिक X खाजगी
सासर X माहेर
साक्षर X निरक्षर
सुगंध X दुर्गंध
सुदैव X दुर्दैव
सुदैवी X दुर्दैवी
सुसंवाद X विसंवाद
सुर्योदय X सूर्यास्त
स्वकीय X परकीय
स्वर्ग X नरक
स्वप्न X सत्य / वास्तव
स्वस्थ X अस्वस्थ
स्वातंत्र्य X पारतंत्र्य
स्वार्थ X निःस्वार्थ
स्वार्थी X निःस्वार्थी
स्वेच्छेने X अनिच्छेने
स्त्री X पुरूष
सुकर्म X दुष्कर्म
सुजाण X अजाण
सुरूवात X अंत / शेवट
सुरेल X बेसूर
सुलभ X दुर्लभ
सोपे X अवघड / कठीण
सोय X गैरसोय
सौम्य X उग्र
संघटन X असंघटन / विघटन
संस्कृत X असंस्कृत
श्रीमंत X गरीब / दरिद्री
श्रीमंती X गरीबी / दारिद्र्य
श्रेष्ठ X कनिष्ठ
हसणे X रडणे
हार X जीत
हिंसा X अहिंसा
होकार X नकार
ज्ञान X अज्ञान

This article has been first posted on and last updated on by