विरूद्धार्थी शब्दांची यादी – ‘च’ पासून ‘झ’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द X विरूद्धार्थी शब्द
चंगळ X टंचाई
चंचल X स्थिर
चटकन X सावकाश
चटोर X भला
चढ X उतार
चढण X उतरण
चढणे X उतरणे
चढाई X माघार
चढेल X निगर्वी
चणचण X विपुलता
चतुर X निर्बुद्ध
चपखल X ढोबल
चपळ X मंद
चपळाई X दिरंगाई
चल X अचल
चलती X अवनती
चलाख X सुस्त
चविष्ट X बेचव
चांगले X वाईट
चांगुलपणा X वाईटपणा
चांडाळ X सज्जन
चाणाक्ष X निर्बुद्ध
चापल्य X जाड्य
चारित्र्यवान X चारित्र्यहीन
चिंताग्रस्त X चिंतामुक्त
चिकाटी X उधळपट्टी
चिरंजीवी X अल्पजीवी
चिरकाल X अल्पकाल
चिरायू X अल्पायुषी
चीड X संयम
चूक X बरोबर
चेतन X अचेतन
चैन X बेचैन
चोखंदळ X अजागळ
चोर X सदाचारी
छान X खराब, वाईट
छाया X प्रकाश
छिथू X वाहवा
छोटा X मोठा
छोटी X मोठी
छोटे X मोठे
छोटेखानी X भव्य
छोटेसे X मोठेसे
जगणे X मरणे
जड X हलके
जन्म X मृत्यू
जमा X खर्च
जय X पराजय
जर X तर
जलद X संथ, सावकाश
जवळ X दूर
जहाल X मवाळ
जा X ये
जागरूक X निष्काळजी
जागृत X निद्रिस्त
जाड X बारीक
जाण X निरजाण
जाणता X अजाणता, नेणता
जाणे X येणे
जिवंत X मृत
जुने X नवे, अद्ययावत
ज्येष्ठ X कनिष्ठ

This article has been first posted on and last updated on by