विभक्ती


प्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपेविभक्तीचे प्रत्यय कसे ओळखावे?

वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचा उपयोग केला जातो.

एखाद्या वाक्यातील नाम आणि सर्वनाम कोणत्या विभक्तीत आहेत, हे ओळखण्यासाठी पुढील उदाहरणे लक्षात घ्यावीत.

उदाहरण क्र. १

आईने मुलीला प्रेमाने समजावले.

वरील वाक्यामध्ये आई, मुलगी आणि प्रेम या शब्दांना विभक्तीचे प्रत्यय लावलेले आहेत.

वाक्यातील उपयोग मूळ शब्द प्रत्यय विभक्ती
आईने आई ने तृतीया एकवचन
मुलीला मुलगी ला चतुर्थी एकवचन
प्रेमाने प्रेम ने तृतीया एकवचन

उदाहरण क्र. २

पाहुणे काल रात्री गावाहून आले.

वरील वाक्यामध्ये गाव या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे.

वाक्यातील उपयोग मूळ शब्द प्रत्यय विभक्ती
गावाहून गाव हून पंचमी एकवचन

उदाहरण क्र. ३

फुलांचे विविध प्रकार बागे होते.

वरील वाक्यामध्ये फुल आणि बाग या शब्दांना विभक्तीचे प्रत्यय लावलेले आहेत.

वाक्यातील उपयोग मूळ शब्द प्रत्यय विभक्ती
फुलांचे फुल चे षष्ठी एकवचन
बागेत बाग सप्तमी एकवचन

विभक्तीचे प्रत्यय जोडून राजा या नामाची होणारी रूपे

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा राजा राजे
द्वितीया राजा, राजाला राजां, राजांना
तृतीया राजाने, राजाशी राजांनी, राजांशी
चतुर्थी राजा, राजाला राजां, राजांना
पंचमी राजाहून राजांहून
षष्ठी राजाचा, राजाची, राजाचे राजांचे, राजांच्या, राजांची
सप्तमी राजा राजां
संबोधन राजा राजांनो

विभक्तीचे प्रत्यय जोडून गाव या नामाची होणारी रूपे

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा गाव गावे
द्वितीया गावा, गावाला गावां, गावांना
तृतीया गावाने, गावाशी गावांनी, गावांशी
चतुर्थी गावा, गावाला गावां, गावांना
पंचमी गावाहून गावांहून
षष्ठी गावाचा, गावाची, गावाचे गावांचे, गावांच्या, गावांची
सप्तमी गावा गावां
संबोधन गावा गावांनो

This article has been first posted on and last updated on by